इंटरनेट स्वातंत्र्याच्या बाबतीत पाकिस्तान हा जगातील सर्वात वाईट देशांपैकी एक

MPSC TECH
0











Related image







इंटरनेट स्वातंत्र्याच्या बाबतीत
पाकिस्तान हा जगातील सर्वात वाईट देशांपैकी एक असल्याचे स्पष्ट झालं आहे.


सोशल मिडियावरील निर्बंध, राजकीय वृत्तांकन यासारख्या गोष्टी लक्षात घेऊन 'कॉम्प्रीटेक'
या माहिती तंत्रज्ञान श्रेत्रातील कंपनीने सर्वेक्षणानंतर अहवाल
जारी केला आहे.


जगभरातील १८१ देशांमध्ये घेण्यात आलेल्या
सर्वेक्षणात पाच महत्वाच्या गोष्टींसंदर्भात प्रश्न विचारण्यात आले होते.


यामध्ये टोरंटस, पॉर्नोग्राफी, बातम्या, सोशल
मिडिया आणि व्हिपीएन अशा पाच गोष्टींवरील निर्बंधांबद्दल प्रश्न विचारण्यात आले
होते.


या सर्वेक्षणामध्ये १० पैकी ७
गोष्टींकरता पाकिस्तान पिछाडीवर असल्याचे असल्याचे दिसले.


इंटरनेट स्वातंत्र्याबाबत तळाला असणाऱ्या
बेलारूस
,
तुर्की, ओमान, संयुक्त
अरब अमिराती
, इरिट्रिया या देशांच्या यादीमध्ये पाकिस्तानचा
समावेश झाला आहे.


या यादीमध्ये तळाला असणाऱ्या देशांमध्ये
इंटरनेटवर खूप निर्बंध आहेत.


या सर्वच देशांमध्ये पॉर्नोग्राफीवर
पूर्णपणे बंदी आहे. इतकचं नाही तर या देशांमध्ये राजकीय बातम्यांवरही अनेक निर्बंध
आहेत.


या यादीमध्ये तळाला उत्तर कोरिया आहे.
चीन नवव्या क्रमांकावर आहे. तर रशिया
, तुर्कमेनिस्तान
आणि इराणही या यादीमध्ये तळाला आहेत.


भारतात २०१९ मध्ये विक्रमी इंटरनेट बंदी


मागील काही वर्षांपासून भारतामध्येही
इंटरनेट बंदीचे प्रमाण वाढल्याचे चित्र दिसत आहे.


देशात कुठेही आंदोलनांनी जोर धरला की, सरकारकडून इंटरनेट बंदीचं अस्त्र उगारले जाते.


२०१२ पासून आपल्या देशात ३८१ वेळा विविध
ठिकाणी इंटरनेट बंदीचे आदेश दिले गेले आहेत.


२०१९ मध्ये त्यातील सर्वाधिक म्हणजे १०६
वेळा इंटरनेट बंद करण्यात आलं होतं.


सरकारकडून वारंवार घेण्यात आलेल्या
इंटरनेट बंदीच्या निर्णयामुळे गेल्या पाच वर्षात तब्बल २१ हजार कोटी रूपये बुडाले
आहेत. जम्मू काश्मीरच्या विभाजनानंतरही अनेक ठिकाणची इंटरनेट सेवा पूर्ववत झालेली
नाही.


आयोध्येचा निकाल, सध्या सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांमुळेही
इंटरनेट सेवा देशभरात अनेक ठिकाणी सातत्यानं खंडीत केली जात आहे.















टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)