style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-2641908921743196"
data-ad-slot="4793160860">
भारत आणि चीनमध्ये
गेल्या काही आठवड्यांपासून तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. नुकतंच भारत आणि
चीनच्या सैन्यांमध्ये झालेल्या चकमकीत चिनी सैन्याच्या गोळीबारात भारताचा एक
अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये लडाखमधील गलवान खोऱ्यात
भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये चकमक झाली. (India-China Border
territory dispute Issue)
भारत-चीन सीमेवर 1975 नंतर प्रथमच असा गोळीबार होऊन सैनिक शहीद झाल्याची घटना घडली आहे. 1975 मध्ये भारताचे 4 जवान शहीद झाले होते. 1975 ला अरुणाचल प्रदेशात संघर्ष उफाळला होता.
भारत-चीन
सीमाभागातील ताजा संघर्ष
5 मे 2020 पासून भारत-चीन सीमेवरील सैन्यात अनेक ठिकाणी आक्रमकता पाहायला मिळत आहे.
पॅनगाँग त्सो भागात 10 आणि 11 मे रोजी
भारत-चीन सैन्यात संघर्ष झाला. या संघर्षात भारताचे 72 जवान
जखमी झाले.
त्याशिवाय सीमाभागात
चीनकडून दोन हेलिकॉप्टरद्वारे गस्त घालणे सुरु आहे. त्यामुळे भारतानेही सुखोई
विमाने सीमेवर तैनात केली. दरम्यान कोणतेही चिनी हेलिकॉप्टर भारतीय हद्दीत आले
नसल्याचे स्पष्टीकरण भारताकडून देण्यात आले.
16 जून ला
लडाखच्या पॅनगाँग लेक भागात झालेल्या संघर्षात 3 भारतीय जवान
शहीद झाले.
तर काही दिवसांपूर्वी
सिक्कीमच्या नथु-ला खिंडीतही संघर्ष झाला होता. यात 150 जवान आमने-सामने आले होते. सिक्कीमधील दोन्ही देशांच्या जवानांत दगडफेक
झाली.
इतकंच नव्हे तर
लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवरही संघर्ष झाला. 21 मे 2020 रोजी चीनी सैन्य लडाखच्या गलवान भागात घुसले. चीनी सैन्याने भारतीय
हद्दीतून बाहेरच सीमेजवळच 70-80 तंबू ठोकले.
24 मे 2020 रोजी तीन भागात चीनी सैन्याने घुसखोरी केली. हॉटस्प्रिंग, पॅट्रोलिंग पॉइंट्स 14 आणि 15
मध्ये चीन सैन्याने घुसखोरी केल्याचे म्हटलं जातं. जवळ 800
ते 1000 चीनी सैन्याने 2 ते 3 कि.मी हद्दीत तंबू ठोकले.
style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-2641908921743196"
data-ad-slot="4793160860">
चीनकडून अवजड वाहने, दुर्बिणी तैनात ठेवण्यात आल्या आहेत. भारतानेही अवघ्या 300 मीटर अंतरावर तंबू ठोकले आहेत.
सीमावाद
सोडवण्यासाठी भारत -चीनमध्ये झालेले 5 करार_
·
1993 – प्रत्यक्ष ताबा रेषेच्या
भागात शांतता राखण्याचा करार
·
1996 – प्रत्यक्ष ताबा रेषेच्या
भागात लष्करीदृष्ट्या विश्वासदृढतेचे प्रयत्न करण्याचा करार
·
2005- प्रत्यक्ष ताबा रेषेच्या
भागात लष्करीदृष्ट्या विश्वासदृढतेचा करार अंमलात आणण्यासाठी प्रोटोकॉल निश्चित
·
2012- सीमेसंबंधीच्या मुद्यावर
चर्चा व समन्वयासाठी यंत्रणेची स्थापना करार
·
2013 – सीमा संरक्षण सहकार्य
करार
भारत-चीन
नेमका सीमा-वाद काय?
भारत आणि चीनमध्ये
एकूण 3488 किलोमीटर लांबीची सीमा आहे. जम्मू काश्मीर, लडाखपासून
ते अगदी सिक्कीम, अरुणाचलपर्यंत तीन भागात ही सीमा विस्तारली
आहे. पश्चिमेकडे जम्मू काश्मीर, मध्य भागात हिमाचल प्रदेश
आणि उत्तराखंड आणि पूर्व भागात सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश ही सीमा विस्तारली आहे.
भारत-चीन या दोन्ही
देशांमध्ये आतापर्यंत सीमा भागाची आखणी किंवा निश्चिती करण्यात आलेली नाही.
भारताच्या पश्चिम क्षेत्रातील भाग चीनचा असल्याचा दावा चीनने अनेकदा केला आहे. हे
क्षेत्र सध्या चीनच्या नियंत्रणात आहे. 1962 मध्ये
झालेल्या युद्धात चीनने हा पूर्ण भाग स्वत:च्या ताब्यात घेतला होता.
तर पूर्व भागात चीनने
अरुणाचल प्रदेशावरही आपला दावा केला. चीनच्या मते हा भाग दक्षिणेकडील तिबेटचा
हिस्सा आहे. अरूणाचल प्रदेश आणि चीन यादरम्यान असणार्या सीमारेषेलाच मॅकमोहन रेषा
(McMahon
Line) म्हटलं जातं. ही मॅकमोहन रेषा हेन्री मॅकमोहन या ब्रिटिश
अधिकार्याच्या पुढाकारातून 1914 मध्ये आखण्यात आली. यासाठी
ब्रिटिश भारतीय सरकार आणि तिबेट सरकारमध्ये सभा झाली होती. पण या सभेला चीन गैरहजर
असल्याने आजही चीनकडून या सीमारेषेबद्दल विवाद निर्माण केला जातो.
1914 मध्ये तिबेट
हे स्वतंत्र देश होता. मात्र चीनने कधीही तिबेटला स्वतंत्र देश मानले नाही. 1950 मध्ये चीनने संपूर्ण तिबेटवर दावा करत ते आपल्या ताब्यात घेतलं. चीन हा
मॅकमोहन लाईनला मान्यता देत नाही आणि त्यामुळेच भारत चीनचा हा दावा नेहमी फेटाळते.
चीनकडून भारताच्या
भारतीय हद्दीतील रस्तेनिर्मितीला हरकत घेण्यात आली. दर्बुक-श्योक-डीबीओ रोडच्या
बांधणीला चीनने आक्षेप घेतला आहे. चीनी आक्षेपानंतर भारताने अन्य प्रकल्पांसाठी 12 हजार कामगार नेले. सीमेवर 20 ठिकाणी भारत आणि
चीनमध्ये वाद सुरु आहेत. (India-China Border territory dispute Issue)
भारत चीन वादाचे सखोल
विशलेषण वाचा आगामी येणाऱ्या "बुलेट पॉईंट - चालू घडामोडी" मध्ये
"Bullet Point - चालू घडामोडी"
One stop solution for current affairs in digital format
Available only @ Amazon Kindle
style="display:block"
data-ad-client="ca-pub-2641908921743196"
data-ad-slot="5919196816"
data-ad-format="auto"
data-full-width-responsive="true">