व्ही व्ही एस लक्ष्मण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक ,तर हृषिकेश कानिटकर हे भारतीय महिला क्रिकेट संघाचे अंतरिम मुख्य प्रशिक्षक.
दिग्गज फलंदाज आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण हे आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक असतील, तर भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू हृषिकेश कानिटकर हे भारतीय महिला क्रिकेट संघाचे अंतरिम मुख्य प्रशिक्षक असतील. 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत चीनमधील हांगझोऊ शहरात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
व्हीव्हीएस लक्ष्मण सध्या बंगळुरूजवळील अलूर येथे आशिया चषकापूर्वी टीम इंडियाच्या शिबिरावर देखरेख करत आहे. लक्ष्मण व्यतिरिक्त, आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये भारताचे माजी लेग-स्पिनर साईराज बहुतुले गोलंदाजी प्रशिक्षक आणि मुनीष बाली क्षेत्ररक्षण प्रशिक्षक असतील.
भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक स्टाफ
भारतीय महिला संघासाठी, नवीन मुख्य प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफची नियुक्ती डिसेंबरमध्ये नवीन आंतरराष्ट्रीय देशांतर्गत हंगाम सुरू होईपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे, 2 कसोटी आणि 34 एकदिवसीय सामने खेळलेल्या कानिटकर, फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या महिला टी-20 विश्वचषकासाठी भारतीय महिला संघाच्या प्रभारी होते. कानिटकर व्यतिरिक्त, राजीव दत्ता (गोलंदाजी प्रशिक्षक) आणि सुभदीप घोष (क्षेत्ररक्षण प्रशिक्षक) हे महिला संघाच्या सपोर्ट स्टाफचे इतर सदस्य असतील.
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष क्रिकेट संघ :
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, राहुल त्रिपाठी, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक).
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ :
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, देविका वैद्य, अंजली सरवानी, तितस साधू, राजेश्वरी गायकवाड, मिन्नू मणी, कनिका आहुजा, उमा छेत्री (यष्टीरक्षक), अनुषा बरेडी.
राखीव खेळाडू : हरलीन देओल, काशवी गौतम, स्नेह राणा, सायका इशाक, पूजा वस्त्राकर.
चालू घडामोडी च्या सखोल अभ्यासासाठी आजच वाचा : Bullet Point (E-Book)