अमेरीकेकडून एच १ बी व्हिसा स्थगित

MPSC TECH
0

style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-2641908921743196"
data-ad-slot="4793160860">


                                Four Indian-Americans arrested in US for H1B visa fraud | World ...



अमेरिकेने एच १ बी हा व्हिसा वर्षअखेरीपर्यंत स्थगित
केल्याने आता भारतीय माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना मोठा फटका बसणार असून
अमेरिकेतील कंपन्यांना
 तेथील स्थानिक लोकांना जास्त वेतनासह काम द्यावे लागणार आहे. एरवी भारतीय
लोक ते कमी पैशात करीत असत.



अमेरिकी अध्यक्ष
ट्रम्प यांनी एच १ बी व्हिसा तूर्त स्थगित करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा फटका
अमेरिकी व भारतीय अशा दोन्ही माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना बसणार आहे. गोल्डमन सॅख
इक्विटी रिसर्चच्या अहवालानुसार या निर्णयाचे नकारात्मक परिणाम
 भारतीय
माहिती तंत्रज्ञान कंपन्यांवर होणार आहेत. भारतीय कंपन्यांनी २०१७ पासून एच १ बी व
एल १ व्हिसावरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांनी स्थानिक
कामगारांनाच नोकऱ्या दिल्या होत्या
, त्यातून अमेरिकी
अर्थव्यवस्थेत अनेक रोजगार निर्माण झाले होते.



सेंट्रल ब्रोकिंगचे
माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ मधू बाबू यांच्या मते भारतीय माहिती तंत्रज्ञान
कंपन्यांची आर्थिक कामगिरी यातून खालावणार नाही. कारण या कंपन्या
कामकाज
व्हिसा
वर अवलंबून नाहीत. कोविड १९ मुळे प्रवास निर्बंधही
लागू आहेत.



एच १ बी व्हिसा सध्या
ज्यांच्याकडे आहे ते मुदतवाढ मागू शकतात
, त्यामुळे तसाही या निर्णयाचा
मोठा परिणाम होणार नाही. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने अमेरिकेत गेल्या पाच
वर्षांत वीस हजार लोकांची भरती केली होती.



इन्फोसिसनेही १० हजार
स्थानिक लोकांना रोजगार दिले होते. गोल्डमन सॅखच्या मते अमेरिकेतील पाच वरिष्ठ
माहिती तंत्रज्ञान कंपन्यात ४५-७० टक्के कामगार हे अमेरिकी आहेत. त्यामुळे या
कंपन्या एच १ बी व्हिसावर विसंबू न नाहीत. इन्फोसिसने अमेरिकेत ६३ टक्के अमेरिकी
लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत.




style="display:block"
data-ad-client="ca-pub-2641908921743196"
data-ad-slot="5725779219"
data-ad-format="auto"
data-full-width-responsive="true">


अमेरिकी नागरिकत्व व
स्थलांतर सेवेच्या माहितीनुसार या वर्षांसाठी २.७५ लाख प्राथमिक
 अर्ज
एच १ बी व्हिसासाठी आले होते. त्यानंतर ४० हजार नोंदणी खाती तयार झाली. ८१ टक्के
लोकांनी प्रत्यक्ष अर्ज केले
, त्यात भारताचे ६७.७ टक्के,
तर १३.२ टक्के चीनचे अर्ज होते.



नॅसकॉमने म्हटले आहे
की
, ट्रम्प यांचा निर्णय हा अमेरिकी अर्थव्यवस्थेला घातक असून त्यामुळे उलट
अमेरिकेतील बरेच काम परदेशात जाईल. कारण स्थानिक पातळीवरचे बुद्धिमान मनुष्यबळ
तेथे नाही.



* अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प
यांच्या निर्णयामुळे वर्षभर अमेरिकेची दारे परदेशी कर्मचाऱ्यांना बंद होणार आहेत.



* एच १ बी- परदेशी
कर्मचाऱ्यांसाठी हा व्हिसा महत्त्वाचा आहे. अमेरिका यात ८५ हजार व्हिसा दरवर्षी
उच्च कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांना देते. सहा वर्षे त्याची वैधता असते. २०१९
मध्ये १८८१२३ व्हिसा या प्रकारात दिले होते. त्यात १३१५४९ हे भारतीय नागरिक होते.



* एच २ बी- हा अकृषी
कामगारांसाठी असलेला मोसमी व्हिसा आहे. अमेरिका यात ६६ हजार व्हिसा दरवर्षी जारी
करते. हा व्हिसा तीन वर्षे वैध असतो. अन्न प्रक्रिया
, हॉटेल्स,लँडस्केपिंग या क्षेत्रात देतात.



* एच ४- या प्रकारचा व्हिसा एच
१ बी व एच २ बी व्हिसा असलेल्यांच्या जोडीदारांना दिला जातो. आताच्या आदेशाचा यावर
परिणाम फार होणार नाही.



* जे १- सांस्कृतिक व शैक्षणिक
आदानप्रदानात हा व्हिसा दिला जातो. त्यात प्रशिक्षणार्थी
, शिक्षक,
सल्लागार यांचा समावेश आहे. सात वर्षे हा व्हिसा वैध असतो.



* जे २- हा व्हिसा
संबंधितांच्या पती किंवा पत्नी व मुले किंवा अवलंबून असलेल्या व्यक्ती यांना दिला
जातो.



* एल१- या प्रकारचा व्हिसा उच्च
स्तरीय विशेष कंपनी कर्मचाऱ्यांना दिला जातो. तो सात वर्षे वैध असतो.



* एल२ - एल १ व्हिसाधारकांवरील
अवलंबित व्यक्तींना हा व्हिसा देतात त्याची मुदत एल १ इतकीच आहे.






style="display:block"
data-ad-client="ca-pub-2641908921743196"
data-ad-slot="5725779219"
data-ad-format="auto"
data-full-width-responsive="true">

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)