style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-2641908921743196"
data-ad-slot="4793160860">
मानवी
हृदयात एकूण चार कप्पे व पाच झडपांचा समावेश होतो. वरच्या बाजूस दोन अलिंद व
खालच्या बाजूस दोन निलय असे कप्पे असतात. अशा रीतीने चार कप्प्यांमध्ये
डावी
कर्णिका/अलिंद (Left Autrium)
उजवी
कणिका/ अलिंद (Right Autrium)
3)
डावी जवनिका /निलय (Left Ventricle)
उजवी
जवनिका/ निलय (Right Ventricle)
यांचा
समावेश होतो.
style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-2641908921743196"
data-ad-slot="4793160860">
अलिंदांच्या
भिंती पातळ असतात, तर निलय जाड भिंतीची बनलेली
असतात. वरची दोन अलिंदे एका पातळ स्थायुमय पटलाने विभक्त झालेली असतात. त्यास
अंतरकालिंदी पट (Inter -Artrial Septum) असे म्हणतात. खालची
दोन निलये मात्र जाड अंतरनिलयी पटलाने (Inter-Ventricular Septum) विभागलेली असतात.
उजव्या
अलिंदात पुढील तीन रक्तवाहिन्यांद्वारे ऑक्सिजनविरहित रक्त आणले जाते.
ऊर्ध्व
शिरारक्त गुहा (Superior Vena Cava),
अधोशीरा
रक्त गुहा (Inferior Vena Cava) आणि
परिमंडली
शिरानाल (Coronary Sinus)
उजवे
अलिंद आणि उजवे निलय यांमधील रक्तप्रवाह त्रिदली झडपांच्या (Tricuspid
Valve) च्या साहाय्याने नियंत्रित केले जाते.
उजव्या
निलयाच्या वरील भागाकडून फुफ्फुस धमनी (Pulmonary Artery) निघते. उजव्या अलिंदातून उजव्या निलयात आलेले ऑक्सिजनयुक्त रक्त
तिच्यामार्फत फुफ्फुसांकडे वाहून नेले जाते. डाव्या अलिंदात फुफ्फुस शिरांची (Pulmonary
Veins) चार रंध्रे उघडतात, त्यांद्वारे ऑक्सिजनयुक्त
रक्त फुफ्फुसांकडून डाव्या अलिंदात आणले जाते.
डावे
अलिंद आणि डावे निलय यांच्यातील रक्तप्रवाह द्विदली (Bicuspid)
किंवा मिट्रल झडप (Mitral Valve) च्या
साहाय्याने नियंत्रित केले जाते.
डाव्या निलयाच्या वरच्या आतील
भागापासून एक प्रमुख धमनी निघते, जिला महाधमनी (Aorta)
असे म्हणतात. डाव्या अलिंदातून डाव्या निलयामध्ये आलेले
ऑक्सिजनयुक्त रक्त तिच्यामार्फत शरीराच्या विविध अवयवांना पुरविले जाते.
हृयाच्या
स्नायूंना परिहृद धमनी (Coronary Artery) द्वारे रक्त
पुरविले जाते.
हृदयातील
झडपांमुळे रक्त एकाच दिशेने प्रवाहित केले जाते.
व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर click करा
style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-2641908921743196"
data-ad-slot="4793160860">