महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. स्थापनेच्या वेळी महाराष्ट्रात 26 जिल्हे, 235 तालुके, 4
प्रशासकीय विभाग होते.सध्यास्थितीत महाराष्ट्रात 36 जिल्हे,
355 तालुके, 535 शहरे, 43663 खेडी, 6 प्रशासकीय विभाग आहेत.
महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभाग:
कोकण (30746
चौ.किमी): मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे,
पालघर, रायगड, रत्नागिरी/सिंधुदुर्ग.
पुणे/प.महाराष्ट्र (57268 चौ.किमी): पुणे, सातारा, सांगली,
सोलापूर, कोल्हापूर.
नाशिक/खान्देश (574426 चौ.किमी): नाशिक, अहमदनगर, धुळे,
जळगाव, नंदुरबार.
औरंगाबाद/मराठवाडा (64822 चौ.किमी): औरंगाबाद, जालना, बीड,
परभणी, हिंगोली, उस्मानाबाद,
लातूर, नांदेड.
अमरावती/प.विदर्भ (46090 चौ.किमी): अमरावती, बुलढाणा, अकोला,
यवतमाळ, वाशिम.
नागपूर/पूर्व.विदर्भ (51336 चौ.किमी): नागपूर, वर्धा, चंद्रपूर,
गडचिरोली, भंडारा, गोंदिया.
नैसर्गिक सीमा :
वायव्येस : सातमाळा डोंगररांगा, गाळणा टेकड्या व सातपुडा पर्वतातील अक्राणी टेकड्या.
उत्तरेस : सातपुडा पर्वतरांगा व त्याचा
पूर्वेस गाविलगड टेकड्या.
ईशान्येस : दरेकासा टेकड्या.
पूर्वेस : चिरोळी टेकड्या व भामरागड डोंगर.
दक्षिणेस : हिरण्यकेशी नदी व कोकणातील तेरेखोल
नदी.
पश्चिमेस : अरबी समुद्र.
राजकीय सीमा व सरहद्द :
वायव्येस : गुजरात व दादरा नगर हवेली.
उत्तरेस : मध्यप्रदेश.
पूर्वेस : छत्तीसगड.
आग्नेयेस : आंध्र प्रदेश.
दक्षिणेस : कर्नाटक व गोवा.