आरबीआय कडून 2 हजारच्या नोटा वितरणातून रद्द करण्याचा चा महत्वाचा निर्णय
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) शुक्रवारी १९ मे ला २ हजार रुपयांच्या नोटा वितरणातून काढून घेण्याच्या निर्णयाची घोषणा केली आहे. तसेच ३० सप्टेंबरपर्यंत नागरिकांनी या २ हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा कराव्यात, असे निर्देश दिले आहेत. २००० हजारांच्या नोटा एका वेळी २० हजारांपर्यंत मूल्याच्याच बदलता येणार आहेत.
२ हजार रुपयांच्या नोटांचा वापर व्यवहार्य नसल्याचा साक्षात्कार झाल्यामुळे २०१८-१९ पासूनच या नोटांचे मुद्रण थांबवण्यात आले आहे. सध्याच्या घडीला एकूण व्यवस्थेमध्ये या नोटांचे एकत्रित चलनमूल्य ३.६२ लाख कोटी आणि प्रमाण १०.८ टक्के इतके आहे. सुरक्षित चलन धोरणाच्या (क्लीन नोट पॉलिसी) अंमलबजावणीसाठी या नोटा हद्दपार करत असल्याचे आणखी एक कारण रिझर्व्ह बँकेने दिले आहे.
याआधी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी एका रात्रीत निश्चलनीकरणाचा, म्हणजेच एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा बाद ठरवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तडकाफडकी जाहीर केला होता.
अर्थव्यवस्थेतील काळा पैसा आणि दहशतवादी कारवायांना होणारी आर्थिक मदत गोठवणे हे निश्चलनीकरणाचे प्रधान उद्दिष्ट होते. तर रोखीचा वापर त्यजून डिजिटलीकरणाला प्रोत्साहन देणे वगैरे काही सहयोगी उद्दिष्टे होती.
2 हजाराच्या नोटा आणि विवाद
2 हजाराच्या नोटची छपाई केल्या पासूनच त्या वादात सापडल्या होत्या, कारण काळा पैसा दहशत वादी कारवाई ला आळा घालण्यासाठी १००० ची नोट बंद करण्याचे सांगण्यात आले होते तर मग त्यापेक्षा अधिक मूल्याची नोट का छापण्यात आली याचे स्पष्टीकरण सरकार देऊ शकले नाही.
सुरुवातीला या नोटा मध्ये माइक्रो चीप असण्याचे काही न्यूज रिपोर्टर कडून सांगण्यात आले होते, पण नंतर हि एक अफवा असल्याचे समजले.
२००० हजार तसेच नवीन ५०० च्या नोटा बनविताना त्याच्या आकारात बदल करण्यात आला ज्यामुळे या नोटा ATM मशीन मधून वितरीत करणे अशक्य झाले. या साठी बँकांना लाखो रुपये खर्च करून ATM मशीन मध्ये बदल करावा लागला.
सुरुवातीच्या काळात तर नवीन २००० च्या नोटेचा रंग सुद्धा निघून जात असे.