विलीनीकरणाचे तत्व
वेलस्लीनंतर इंग्रज सत्तेची मोठी वाढ र्लॉड डलहौसीने केली. खर्या अर्थाने तो इंग्रजांचे साम्राज्याचा निर्माता होता.तो अत्यंत कार्यक्षम व महत्वाकांक्षी गव्हर्नर जनरल होता. इंग्रजांचे राज्य वाढवीत असता त्याने निती अनीतीचा फारसा विचार केला नाही. इंग्रजी साम्राज्यावादाचा तो खराखुरा प्रतिनिधी होता.
र्लॉड डलहौसी कर साम्राज्यवादी होता. पंजाब व ब्राम्ही युध्दांनतर त्याने आपले लक्ष अंतर भारतीय संस्थानांकडे वळविले. कारण अजूनही देशात अनेक लहान मोठी. विखूरलेली होती ज्यामूळे कंपनीचे राज्य एकसंघ न राहता तुटक दिसत होते. या संस्थानांना या ना त्या कारणांनी नष्ट करून भारतात कंपनीचे सामर्थ्यसंपन्न असे साम्राज्य निर्माण करण्याची डलहौसीची इच्छा होती. भारतातील विविध राज्ये खालसा करण्यासाठी त्याने पुढील युक्त्या शोधून काढल्या.
(1) राजाला प्रत्यक्ष युध्दात जिंकणे
(2) दत्ताक वारस नामंजूर करणे
(3) कंपनीने पूर्वी दिलेल्या पदव्या व पेन्शन बंद करणे
(4) एखाद्या राज्यकर्त्याचा राज्यकारभार अव्यावस्थित असेल तर ते राज्य खालसा करणे
(5) तैनाती फौजेची ठरविलेली खंडणी न दिल्यास त्या राज्याचा काही मुलुख ताब्यात घेणे अशा विविध कारणांनी त्याने अनेक राज्ये ब्रिटिश साम्राज्यास जोडली.
दत्ताक वारस नामंजूर करणे
या तत्वानुसार कंपनीची सत्ता भारतात स्थापन होण्यापूर्वी जी अनेक राज्ये अस्तित्वात होती त्यांना दत्ताक वारस नामुंजुरीचे तत्व लावावयाचे नाही परंतु जी राज्ये इंग्रजांनी निर्माण केली त्यांना यात हा नियम लागू करण्याचे ठरविले. पण प्रत्यक्षात र्लॉड डलहौसीने सरसकट जी संस्थाने दत्ताक नामंजुरीच्या तत्वावर खालसा केली त्यावरून असे दिसते की त्याने स्वत: केलेला नियम पाळला नाही हिंदू धर्मशास्त्रानूसार एखाद्या राजास औरस संतती नसल्यास त्याला आपला वंश चालविण्यासाठी व आई वडिलांच्या मृत्यूनंतरचे संस्कार पार पाडण्यासाठी दत्ताक पुत्र घेण्याचा विधी ज्यांना मुलबाळ नसेल असे राजे महाराजे पार पाडीत असत. त्यानंतर या दत्ताक पुत्रास औरस पुत्राचे सर्व अधिकार मिळत असत. पण हे तत्व डालहौसीने मान्य केले नाही तो म्हणतो की वंश चालविण्यासाठी दत्तक घेण्याची गरज असल्यास संस्थानिकांनी खुशाल दत्ताक घ्यावा आणि त्यास आपली वैयक्तीक संपत्ती द्यावी, राज्य नाही जर दत्ताक पुत्रास राज्याचा वारस करण्याचा हेतु असेल तर कंपनी सार्वभौम असल्याकारणाने दत्ताक घेण्यापूर्वी तिची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. तशी परवानगी न घेतल्यास सार्वभौम सत्ता या नात्याने कंपनी त्या दत्ताकाला राज्याचा वारस म्हणून मान्यता देणार नाही. या धोरणानुसार त्याने अनेक भारतीय संस्थाने खालसा केली. दत्तक नामंजुरीच्या या सिध्दान्तानुसार पुढील राज्ये खालसा केली
(अ) सातारा :
1848 साली येथील राजा शहाजी भोसले याचा मृत्यू झाला.त्यापूर्वी त्याचा भाऊ प्रतापसिंह याचाही मृत्यू झाला होता. औरस संतती नसल्यामुळे दोघांनीही इंग्रज रेसिडेंटसमोर विधियुक्त दत्ताक विधान केलेले होते. पण डलहौसीने या दत्ताक विधानास परवानगी न देता राज्य खालसा केले.
(ब) नागपूर :
1853 मध्ये येथील राजा तिसरा राघोजी भोसले याचा मृत्यू झाला मृत्यूपूर्व त्याने कंपनीकडे राज्यासाठी दत्ताक घेण्याची परवानगी मागितली होती ती न आल्याने राजाने मृत्यूपूर्वी यशवंतराव नावाच्या मुलास दत्ताक घेण्याची माहिती आपल्या पत्नीस कळवली होती. त्यानुसार दत्ताक विधान झाले परंतू डलहौसीने या दत्ताकास परवानगी न देता राज्य लाखसा केले.
(क) झाशी :
1818 मध्ये इंग्रजांनी पेशव्यांचे राज्य खालसा केल्यानंतर झाशीचा प्रदेश ओघाने इंग्रजाकडे आला. तो प्रदेश इंग्रजांनी वंशपरंपरेने राम चंद्रराव नेवाळकर यास 1832 मध्ये बेटिंगने राम चंद्ररावास महाराज ही पदवी दिली. त्यांचा 1835 साली मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूनंतर चुलता रघुनाथराव यास इंग्रजांनी गव्हर्नर केला, पण तोही निपुत्रिक मरण पावल्यामुळे गंगाधरराव हा राजा झाला. 1853 साली त्याचा मृत्यू झाला त्याने राजाने मृत्यूपूर्वी दामोदरराव नावाच्या मुलास दत्ताक घेतले होते, परंतू डलहौसीने या दतकास नकार देऊन झाशीचे राज्य खालसा केले.
ज्या राज्यांना औरस संतती नव्हती आणि ज्यांनी मृत्यूपूर्वी हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे कोणालाही दत्तक घेतले नव्हते अशी अनेक लहान संस्थाने डलहौसीने खालसा केली.
पदव्या व पेन्शन समाप्ती
(अ) पेशवा :
1851 साली दुसर्या बाजीरावाचा मृत्यू झाला त्याने धोडोपंत र्ऊफ नानासाहेबास दत्तक घेतले होते. पित्याच्या मृत्यूनंतर आपणास त्यांची जहागीर व पेन्शन मिळावी अशी नानासाहेबांनी कंपनीकडे मागणी केली. पण डलहौसीने ती मागणी अमान्य करुन जहागीर व बाजीरावास दिले जाणारे वार्षिक पेन्शन देणे बंद केले.
(आ) कर्नाटक :
1853 साली नवाब गाउझखानाचा मृत्यू झाला. त्याला मुलगा नसल्यामुळे मद्रास सरकारने केलेल्या शिफारशीवरून डलहौसीने नबाब पद खालसा केले.
(इ) तंजावर :
तंजावरच्या शिवाजी राजांना फक्त मुली होत्या मुलगा नव्हता, त्यामुळे त्याच्या मृत्यूनंतीर तंजावर खालसा केले.
(ई) मोगल सम्राट :
मोगल सम्राटाचे नामधारी पद समाप्त करण्याचे डलहौसीने ठरविले. पण कंपनीच्या संचालकांनी या गोष्टीस मान्यता दिली नाही. असे असूनही डलहौसीने सम्राट बहादूरशहाच्या एका मुलास आपल्या बाजूला वळवून घेतले युवराज पद मिळविण्याच्या मोहाने या राजपुत्राने दिल्लीचा लाल किल्ला कंपनीस देण्याचे व कंपनी सांगेल तेथे जाऊन राहण्याचे आश्वासन डलहौसीला दिले.
अव्यवस्था व अराजकतेमुळे राज्य खालसा
(अ) वर्हाड :
निजामाकडे तैनाती फौजेच्या खर्चाची बरीच बाकी थकली होती ती त्यास देणे शक्य नसल्यामुळे इंग्रजांनी 1851 मध्ये पैशांच्या मोबदल्यात वर्हाड व त्याच्याजवळचा काही प्रदेश निजामाकडून घेतला अशा धोरणामुळे हळूहळू कंपनीच्या राज्यातील तुटकपणा कमी होत जाऊन ते अधिक एकसंघ व एकरुप होऊ लागले.
(आ) औंध (अवध) :
ईस्ट इंडिया कंपनीच्या राज्य स्थापनेपासून हे राज्य कंपनीचे मित्र राज्य होते. डलहौसी भारतात येण्याआधीच येथील नवाब उधळे व व्यसनी असल्यामूळे तेथे अराजकता निर्माण झाली होती. डलहौसी आला तेव्हा ती अधिकच वाढली होती. तेथील राज्यकारभारातील अराजकता थांबविण्यासाठी डलहौसीने स्लीमन व आऊटराम या रेसिडेंटांना पाठवले. पण तेथील परिस्थिती नियंत्रबाहेर असल्याचे त्यांनी कळवले तेव्हा स्वत: डलहौसीने औध संस्थान खालसा केले. आणि तेथील नवाब वाजीद अलीशहा यास 12 लक्ष रु पेन्शन दिली.
(इ) सिक्कीम :
हिमालयाच्या उतारावरील व नेपाळच्या सीमेलगत असलेले हे एक स्वतंत्र राज्य होते सिक्कीमच्या राजाने तेथील इंग्रज वकिलास बंदिवान करुन दोन इंग्रज माणसांचा अपमान केला होता. त्यामूळे डलहौसी चिडला व त्याने या राज्यावर स्वारी करून दार्जिलिंगचा भाग जिंकून घेतला आणि ते सिक्कीमचे राज्य खालसा केले .
· 1765-1772 या काळात बंगालमध्ये ही दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात होती.
· या व्यवस्थेमुळे गोंधळ व भ्रष्टाचार निर्माण झाल्याने 1772 मध्ये वॉरन हेस्टिंग्ज ने बंद केली.