बक्सार चे युद्ध

MPSC TECH
0

बक्सार चे युद्ध

पार्श्वभूमी

बक्सार चे युद्ध बंगालचा नवाब मीर कासिम, अवधचा नवाब सुजाद्दौला आणि मोगल शासक शाह आलम दुसरा यांची संयुक्त सेना आणि ब्रिटीश यांच्या मध्ये झाले. प्लासी च्या युद्धामुळे बंगालच्या राजकारणात प्रवेश झाला होता पण या युद्धामुळे ब्रिटीशांची सत्ता बंगाल वर प्रस्थापित झाली. प्लासी च्या लढाई नंतर ब्रिटीशांनी मीर जाफर याला बंगालच्या नवाब पदावर बसविले त्या बदल्यात त्याने  इंग्रजांना अमाप पैसा आणि जमीन दिल्या त्यामुळे  मीर जाफर यांच्यासमोर अनेक राजकीय आणि आर्थिक समस्या उभ्या राहिल्या. त्यामुळे मीर जाफर नावापुरता नवाब राहिला. सर्व सामर्थ्य क्लाईव्ह च्या हातात होते . कंपनीला मोठ्या प्रमाणावर पैसा दिल्यामुळे राज्य आर्थिक संकटात सापडले होते पैशाअभावी सैनिक बंड करीत होते. तर इकडे इंग्रज मीर जाफर वर हप्ते देण्यासाठी दबाव आणत होते. मीर जाफरने पैसे देण्यास असमर्थता दर्शविल्यावर क्लाईव्ह ने मीर जाफर ला नवाब पदावरून काढून त्या बदल्यात त्याचा जावई मीर कासीम याला नवाब पदावर बसविले

अधिक द्रव्यालोभाने प्रेरित होऊन इंग्रजांनी मीर कासीम यास 1760 मध्ये बंगालचा नबाब म्हणून जाहीर केले. पण मीर कासीम हा मोठा कर्तबगार सुभेदार निघाला. त्याने बंडखोर जमीनदारांना वठणीवर आणून कारभाराची घडी बसवण्याचा प्रयत्न सुरु केला. इंग्रजाचे देणे त्याने देऊन टाकले. एवढेचे नाही तर इंग्रज अधिकाऱ्यांच्या चोरटया व्यापारास आक्षेप घेतला मीर कासीम हा स्वतंत्र प्रवृत्तीचा होता ही गोष्ट इंग्रजांना आवडली नाही म्हणून इंग्रजांनी पुन्हा मीर जाफर यास बंगालचा नवाब म्हणून जाहीर केले. त्यामुळे मीर कासीम शुजाउद्दौला या अयोध्येच्या नबाबाकडे मदतीसाठी गेला. मोगल बादशहा शहा आलम, शुजाउद्दौला व मीर कासीम या तिघांनी मिळून इंग्रजांशी युध्द करण्याचे ठरवले. त्यानुसार या तिन्ही सत्ताधीशांच्या फौजा एकत्र आल्या मेजर  मन्रो या सेनानीच्या नेतृत्वाखाली इंग्रज सैन्याने या सयुक्त सैन्याशी 22 ऑक्टोबर, 1764 रोजी बिहारमधील बक्सार येथे घनघोर युध्द केले. त्यात इंग्रजांनी प्रयत्नांची शर्त करुन या संयुक्त सैन्याचा पराभव केला  हा विजय ऐतिहासिक महत्वाचा ठरला. पराभूत मुघल बादशाह व अवधचा नवाब यांच्याशी सन 1765 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने रॉर्बट क्लाईव्हने तह केला. हा तह अलाहाबादचा तह म्हणून प्रसिध्द आहे. या तहान्वये बंगालच्या सुभ्यातून महसूल गोळा करण्याचा अधिकार इंग्रजांनी मिळवला. यालाच दिवाणी अधिकार असे म्हणतात. तसेच बंगाल सुभ्यातून दिवाणी अधिकाराप्रमाणे इंग्रजांनी बंगालच्या नवाबकडून फौजदारी अधिकारीही मिळवले. यामुळे इंग्रज हे बंगालचे प्रत्यक्ष शासक बनले. नवाब केवळ नामधारी शासक राहिला ईस्ट इंडिया कंपनी राजकीय सत्ताधारी बनली. भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया अशा प्रकारे बंगालमध्ये घातला गेला. त्या वेळी मराठे, निजाम आणि हैदरअली (म्हैसूर)  अशा तीन प्रमुख सल्तनत होत्या. या तीन सल्तनत आपल्याविरुध्द एकत्र आल्या तर आपला निभाव लागणार नाही हे इंग्रज जाणून होते. हे संकट उभे राहू नये, म्हणून इंग्रजांनी भेदनीती वापरली. हैदरअली (म्हैसूर) व मराठे यांच्याविरुध्द निजामाला त्यांनी मदत देऊ केली, तसेच त्याला प्रादेशिक लाभाचे आमिष दाखवले. यामुळे निजामाने कधीच इंग्रजांविरुध्द संघर्ष केला नाही.

बक्सारच्या लढाईचे महत्व

(1) बक्सारच्या युध्दातील विजयामुळे पूर्व भारतात इंग्रजांची सल्तनत कायम झाली.

(2) प्लासीने अर्धवट केलेले काम बक्सारने पूर्ण केले.

(3) अयोध्येचा वजीर व स्वत बादशहा कंपनीच्या हातात आला

(4) मीर जाफर पुन्हा बंगालचा नबाब झाला.

(5) बंगालच्या गोंधळात कंपनीच्या कारभाराने अधिक भर घातली.

(6) युरोपियन सेना उत्कृष्ट असल्याचे इंग्रजानी सिध्द केले.

परिणाम

१. राजकीय परिणाम

राजकीय स्वरूपात बक्सारच्या युद्धाने इंग्रजांची राजकीय सत्ता खऱ्या अर्थाने प्रस्थापित झाली.

बक्सारच्या युद्धा मध्ये ब्रिटीश सैनिकांचे सैनिकी कौशल्य आणि पराक्रम प्रदर्शित झाले

सोबतच  उत्तर प्रदेश आणि पश्चिम प्रांतावर कंपनीला हक्क मिळाला.

२. आर्थिक परिणाम

या युद्धाची नुकसानभरपाई म्हणून बंगालमधून ब्रिटीशांनी ५० लाख रुपये वसूल केले.

कर न घेता व्यापार करण्याच्या अधिकार ब्रिटीशांना मिळाल्या मुळे श्रीमंत बंगाल प्रांताची परिस्थिती कमकुवत झाली.

ब्रिटीशांचा भ्रष्टाचारही यामुळे  खूप वाढला आहे, ज्यामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली.

भारताची सर्वोच्च शक्ती पराभूत झाली

बक्सारच्या युद्धाचा सर्वात महत्वाचा निकाल म्हणजे भारताची सर्वोच्च सत्ता, बादशाह शाह आलम, त्याचे नवाब वजीर, बंगालचे नवाब यांनी संयुक्तपणे पराभूत केले. युद्धामध्ये बादशहाच्या पराभवाचा परिणाम असा झाला की कंपनीची सत्ता आणि वर्चस्व नवाब आणि जनतेने स्वीकारले. यामुळे भारतीय शक्तींची प्रतिष्ठा ढासळली अशा प्रकारे सम्राटाची मान्यता मिळताच ही कंपनी वैधानिक प्रमुख आणि निर्णायक शक्ती बनली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)