१) उत्तर अमेरिका खंडातील पठारे
कोलोरॅडो : उत्तर अमेरिकेतील प्रमुख पठारी प्रदेश तेथील पर्वतश्रेणींशी निगडित आहेत. कोलोरॅडो हे उत्तर अमेरिकेतील सर्वांत विस्तीर्ण पठार आहे. हे सुमारे ३.३७ चौ.किमी क्षेत्र व्यापते. हे रॉकी पर्वतांच्या दक्षिण भागात, मरे-डार्लिंग मैदान माउंट ओसा पश्चिम उतारावर आहे. कोलोरॅडो नदी या पठारावरून पश्चिमेकडे वाहत जाते. या नदीच्या अपक्षरण कार्यामुळे खूप खोल अशी घळई निर्माण झाली आहे. या घळईस ‘ग्रँड कॅनियन’ म्हणून ओळखले जाते. या नदीमुळे कोलोरॅडोचे पठार उत्तर व दक्षिण भागात विभागले गेले आहे.
कोलंबिया : रॉकी पर्वतातील दुसरे प्रमुख पठार म्हणजे कोलंबियाचे पठार. कोलंबिया पठार हे अमेरिकेच्या वॉशिंग्टन, ओरेगॉन व आयडाहो या राज्यांच्या काही भागांत स्थित आहे. हे कॅस्केड पर्वतशृंखला व रॉकी पर्वतांनी वेढलेले आहे आणि ते कोलंबिया नदीने विभाजित झाले आहे. भूपृष्ठावर लाव्हारस पसरून तयार झालेले खडक या प्रदेशात असून, या खडकांची जाडी काही हजार मीटरपर्यंत आढळते.
कोलोरॅडो व कोलंबिया ही दोन्ही आंतरपर्वतीय पठारे आहेत. ॲपेलेशियन पर्वताच्या दोन्ही उतारांवर पर्वतपदीय प्रकारची ही पठारे आहेत. पश्चिम उतारावरील पठारास ॲपेलेशियन पठार, असेच नाव आहे; तर पूर्वेकडील पठारास पर्वतपदीय पठार, असे म्हणतात. हे पठार ॲपेलेशियन पर्वतांपासून अटलांटिकच्या किनाऱ्यापर्यंत विस्तारलेले आहे. या पठाराने जवळपास दोन लाख चौ.किमी क्षेत्र व्यापलेले आहे. सुमारे २५० ते ३०० मीटरदरम्यान उंची असलेल्या लहान लहान टेकड्यांनी हे पठार बनले आहे.
२) दक्षिण अमेरिका खंडातील पठारे
अँडीज पर्वतातील आंतरपर्वतीय पठारांशिवाय दक्षिण अमेरिकेत तीन प्रमुख पठारे खंडाच्या पूर्व भागात आहेत.
- गियाना पठार
- ब्राझील पठार
- पॅटागोनिया पठार
ही पठारे अँडीज पर्वतांपेक्षा खूप प्राचीन आहेत. गियाना व ब्राझील पठारे अॅमेझॉन नदीमुळे विलग झालेली आहेत.
१) गियाना पठार : गियाना पठारावरील सर्वांत उंच शिखराची उंची सुमारे २,८१० मीटर आहे. सततचे दमट हवामान आणि जास्त उठाव यामुळे या भागात अनेक धबधबे आहेत. जगातील सर्वांत उंच असा एंजल धबधबा या भागात असून, या धबधब्याच्या खड्या उतारावरून पाणी थेट सुमारे ८०२ मीटर खाली पडते.
२) ब्राझील पठार : ब्राझील उच्च भूमीचा प्रदेश जवळजवळ ४५ लाख चौ.किमी क्षेत्र व्यापतो. याची उंची ३०० ते १५०० मीटरच्या दरम्यान आहे. यावरील सर्वोच्च शिखराची उंची सुमारे २,८६४ मीटर आहे. ब्राझीलच्या नैर्ऋत्येला अर्जेंटिनाची उच्च भूमी आहे.
३) पॅटागोनिया पठार : पॅटागोनिया हा दक्षिण अमेरिकेचा दक्षिणेकडील भाग आहे; जो अर्जेंटिना आणि चिली यांच्यामध्ये विभागलेला आहे. अर्जेंटिनामधील त्याची उत्तर सीमा कोलोरॅडो नदीने चिन्हांकित केली आहे. येथील सर्वोच्च पॅटागोनिया शिखराची उंची सुमारे २,८८४ मीटर आहे. हवामान पश्चिमेला थंड व दमट आणि पूर्वेला कोरडे आहे. या प्रदेशात अँडीज पर्वताच्या दक्षिणेकडील भागात सरोवरे, फजोर्ड्स, समशीतोष्ण वर्षावने, पश्चिमेला हिमनदी आणि पूर्वेला वाळवंट, टेबललँड्स व स्टेपप्स यांचा समावेश आहे.