सचिन तेंडुलकर राज्य सरकारच्या स्वच्छ मुख अभियानाचा स्माइल अ‍ॅम्बेसेडर.

MPSC TECH
0

 


प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची राज्याच्या स्वच्छ मुख अभियानासाठी महाराष्ट्राचा ‘स्माइल अ‍ॅम्बेसेडर’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सरकारकडून त्यांची “स्माइल अ‍ॅम्बेसेडर” म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सचिन तेंडुलकरनं पुढच्या पाच वर्षांसाठी या अभियानात स्माइल अ‍ॅम्बेसेडरच्या स्वरूपात नियुक्त होण्यास सहमती दर्शवली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मौखिक आजार वाढत आहेत. त्याला आळा घालण्यासाठी राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत मौखिक आरोग्याबाबत योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने ‘महाराष्ट्र मौखिक आरोग्य अभियान‘ म्हणजेच ‘स्वच्छ मुख अभियान‘ राबविण्याचं ठरवलं आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ मुख अभियानाच्या बोधचिन्हाचे तसेच बोधवाक्याचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. राज्य शासनाच्या वतीने हे अभियान जानेवारी २०२३ पासून सुरू करण्यात आले आहे. कॅलेंडर, कॅम्प आणि कॅम्पेन या त्रिसूत्रीच्या माध्यमातून समाजात मौखिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अभियान राबवले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)