भारताचे गव्हर्नर जनरल
भारत सरकार अधिनियम 1833 अनुसार ब्रिटिश सरकारचे क्षेत्रफळ संपूर्ण भारतात पसरले होते याकरिता 1833 चा अधिनियम तयार करून बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचे गव्हर्नर जनरल असे नाव देण्यात आले व पहिला भारताच्या गव्हर्नर जनरल बनण्याचा मान लॉर्ड विल्यम बेंटींकला प्राप्त झाला याच्या काळात सरकारी सेवेमध्ये जातीय भेदभाव कमी करण्यात आला. कलकत्ता या ठिकाणी 1835 मध्ये मेडिकल कॉलेजची स्थापना करण्यात आली. याच्याच काळात मेकॉले चा सिद्धांत प्रसिद्ध करण्यात आला. बेंटिकने रणजितसिंग सोबत मैत्रीची संधी केली.
चार्ल्स मेटकॉफ (1835)
हा तात्पुरत्या कालावधी साठी भारताचा गव्हर्नर जनरल बनला होता याच्या कालावधीत केलेली एकच महत्वाची गोष्ट म्हणजे वृत्तपत्रांना स्वातंत्र्य दिले या मुळे याला वर्तमानपत्राचा मुक्तिदाता असे म्हणतात.
लॉर्ड ऑकलंड (1836-1842)
लॉर्ड ऑकलंड यांनी 1836 ते 1842 पर्यंत भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून काम केले.
गव्हर्नर जनरल म्हणून लॉर्ड ऑकलंड यांनी प्रशासनिक नेमणुका, निवृत्तीवेतन आणि कायद्यासाठी प्रांतिक प्रशासकांचे मार्गदर्शन यासाठी सामान्य नियमावली तयार केली. पाश्चात्य शिक्षण, विशेषतः वैद्यकीयशास्त्राच्या प्रसाराचे त्यांनी समर्थन केले.
ऑक्टोबर 1938 मध्ये ऑकलंडने मित्र मोहम्मद विरुद्ध सिमला घोषणापत्रात युद्ध करण्याचे ठरविले. अफगान युद्धाच्या माध्यमातून त्यांनी सिंधमधील अमिरांना त्याचे सार्वभौमत्व स्वीकारण्यास भाग पाडले. अँग्लो-इंडियन साम्राज्याची सुरक्षा आणि अखंडता राखण्याण्याच्या नावाखाली आखाती देशातील पर्शियन प्रांत देखील त्याने हस्तगत केले.
यापूर्वी अवधमध्ये पसरलेल्या अशांततेला दडपण्यात सुद्धा ऑकलंडला यश आले होते आणि त्यांनी कुर्नूल आणि साताराच्या राजांच्या संस्थानावर सुद्धा ताबा मिळवला होता.
ऑकलंडलाही बर्याच ब्रिटीश अधिकाऱ्याप्रमाणे रशियन आक्रमण होण्याची भीती होती. डिसेंबर 1838 मध्ये ऑकलंडच्या सिंधू सैन्याने अफगाणिस्तानाकडे कूच केले. मोहिमेची सुरुवात चांगली केली झाली होती. त्याचवेळेस 1841 मध्ये मॅकॅथेन यांनी अजून सैन्य पाठविण्याची विनंती केली. ऑकलंडने ते सैन्य पाठविण्यास उशीर केल्यामुळे मॅकनाटेन मारला गेला आणि ऑकलंडच्या सिंधू सैन्याला अफगाणिस्तान सोडून खुर्द-काबूल खिंडीकडे जाणे भाग पडले. ब्रिटीश सैन्याचा हा सर्वात मोठा पराभव होता. यानंतर ऑकलंड इंग्लंडला परतला आणि त्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत लॉर्ड एलेनबरो यांच्याकडे गव्हर्नर जनरल हे पद सोपवले.
लॉर्ड एलेनबरो (1842-1844)
1842 मध्ये एलेनबरो यांला भारताच्या गव्हर्नर जनरल पदावर नियुक्त केले गेले. एलेनबरो याच्या नियुक्ती नंतर त्याने यशस्वीपणे पहिले अँग्लो-अफगाण युद्ध संपवले
सिंध सोबत युद्ध : एलेनबरोने चार्ल्स नेपियरला सिंध वर चाल करून पाठविले आणि ऑगस्ट १८४३ मध्ये नेपियरने सिंधला ब्रिटीश साम्राज्यात पूर्णपणे जोडले.
ग्वाल्हेर सोबत युद्ध : 1846 मध्ये जनकजी सिंधिया यांचे निधन झाले. त्याला मूलबाळ नव्हते. म्हणूनच त्यांची विधवा पत्नी ताराबाईं हिने मुलाला दत्तक घेतले आणि गव्हर्नर जनरलच्या परवानगीने एक एजंट नेमला गेला. पण त्या एजंटने ग्वाल्हेरच्या सैन्यात बंडखोरी होईल अशी भीती व्यक्त केली त्यामुळे गव्हर्नर जनरल एलेनबरो यांनी सैन्यात कपात करण्याची मागणी केली.हे मान्य करण्यास ग्वाल्हेरने नकार दिला त्यामुळे ब्रिटीश आणि ग्वाल्हेर यांच्या मध्ये युद्धाला सुरुवात झाली या मध्ये सिंधिया सैन्याला पराभवाचा सामना करावा लागला.
पायउतार : एलेनबरो याच्या भारतातील कारभाराबद्दल ब्रिटन मधील संचालक असमाधानी होते. म्हणूनच जून 1844 मध्ये योग्य कारवाई करून त्याला परत येण्याचे आदेश देण्यात आले.
लॉर्ड हार्डिंग पहिला (1844-1848)
गव्हर्नर जनरल म्हणून भारतात येण्यापूर्वी लॉर्ड हार्डिंग २० वर्षे ब्रिटीश संसदेत होते.
पहिले इंग्रज - शीख युद्ध (1845–1846)
त्याच्या कारकिर्दीतील मुख्य घटना म्हणजे डिसेंबर 1845 मध्ये सुरू झालेली शीख युद्धाची घटना जी 1846 मध्ये लाहोरच्या कराराने संपली. या करारामुळे भरपाई म्हणून इंग्रजांना अडीच कोटी मिळाले.
पार्श्वभूमी :
11 डिसेंबर 1845 रोजी शीख सैन्याने हरिके आणि कसूर दरम्यान सतलज नदी ओलांडली. 13 डिसेंबर, 1845 रोजी लॉर्ड हार्डिंगने युद्ध जाहीर केले आणि आदेश दिला की "सतलजच्या डाव्या बाजूला असलेल्या महाराजा दिलीपसिंगच्या राज्याचा भाग आता इंग्रजी राज्यात जोडला गेला आहे".
या युद्धाच्या वेळी दोन्ही सैन्य 5 वेळा समोरासमोर आल्या : मुडकी युद्ध, फिरोजशहाचे युद्ध, बडोवालची लढाई, अलीवालची लढाई, उपनगरीय लढाई
या युद्धात लालसिंग आणि शीख सैन्याचे सरदार सेनापती तेजसिंग यांच्या विश्वासघातमुळे 10 फेब्रुवारी 1846 रोजी शीखांचा निर्णायकपणे पराभव झाला. युद्धानंतर लाहोरचा तह झाला. हा करार महाराजा दिलीपसिंग व ब्रिटिश यांच्यात झाला.
लाहोरचा तह : 9 मार्च 1846 रोजी लाहोरचा तह झाला. या अंतर्गत शीख राज्याने सर्व प्रदेश सतलजच्या पलीकडे कायमचा सोडला. ब्रिटिशांना शीख राज्याने दीड कोटींचे युद्ध नुकसान भरपाई द्यावी लागली. अल्पवयीन दिलीपसिंग यांना महाराजा म्हणून स्वीकारण्यात आले आणि राणी जींद कौर यांना त्यांचे संरक्षक बनविण्यात आले. लालसिंग यांना शीख राज्याचा वजीर बनविण्यात आले. सर्व कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी एक इंग्रज अधिकारी (हेन्री लॉरेन्स) नेमला गेला. या युद्धानंतर शीखांचा प्रसिद्ध कोहिनूर हिरा देखील राणी व्हिक्टोरियाकडे इंग्लंडला पाठविला गेला.
इतर घटना
हार्डिंगने आपल्या कारकिर्दीत बरीच सुधारणा केली, त्याने अनेक कर काढून टाकले गेले, सैन्य खर्च कमी केला, सोबतच त्याने सती प्रथा रद्द करण्यासाठी तसेच नरबळी या सारख्या प्रथा बंद करण्यात महत्वाची भूमिका बजावली आणि प्राचीन भारतीय स्मारकांच्या संरक्षणासाठी योग्य व्यवस्था केली गेली होती.
लॉर्ड डलहौसी (1848-56)
जन्म : 22 अप्रैल 1812 (मिडलोथियान)
याने दत्तक वारसा पद्धत नामंजूर करून संस्थांने खालसा केली आणि ब्रिटीश साम्राज्य मध्ये विलीन केली. यामध्ये सातारा, जयपूर, संभलपूर, उदयपूर, झाशी, नागपूर या संस्थानाचा समावेश होता. तर कुशासनाचा आरोप लावून अवध प्रांत ब्रिटिश साम्राज्यात विलीन केले. १८४९ मध्ये संपूर्ण पंजाब ब्रिटिश सरकारमध्ये विलीन केलेआणि महाराज दिलीप सिंग याला पेंशन देवून ईंग्लंड ला पाठविले. ब्रह्मदेश भारतात विलीन केले . तसेच तार, पोस्ट, रेल्वे, रस्ते यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने त्याची सुरुवात यांनी केली. डलहौजी यांनी सिमला येथे उन्हाळी राजधानी व सैन्य मुख्यालयाची स्थापना केली. याच काळामध्ये विश्वविद्यालयाची स्थापना झाली. 1853 मध्ये मुंबई ठाणे दरम्यान प्रथम रेल्वेमार्गाची निर्मिती केली. 1854 मध्ये पोस्ट ऑफिस अधिनियम (कायदा) संमत केला.विद्युत विभागाची स्थापना केली .पोस्टल तिकिटाची सुरुवात केली. भारताचे चलन रुपया म्हणून सुरुवात केली. पहिली तार लाईन आग्रा ते कलकत्त्याची सुरुवात केली.
लॉर्ड कॅनिंग (1856-58)
याने मुंबई, मद्रास, कलकत्ता याठिकाणी हायकोर्टाची व विद्यापीठाची स्थापना केली. सैन्यातील भारतीय सैनिकांची संख्या कमी करून ब्रिटिश सैनिकांची संख्या वाढवण्यात आली. सैनिकांना धार्मिक चिन्ह धारण करण्यास बंदी घालण्यात आली. मुघल बादशाहा पद समाप्तीची घोषणा केली .त्यांची चलन मुद्रा रद्द करण्यात आले. याच काळात विधवा पुनर्विवाह कायदा केशवचंद्र सेन यांच्या साह्याने पारित (समंत) झाला. कॅनिंगच्या काळ्यातच 1857चा विद्रोह (उठाव) घडून आला.ज्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता भारतातून संपुष्टात आली आणि महाराणीच्या नावे ब्रिटिश संसदेकडे हस्तांतरित झाली . कॅनिंग हा भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल होता होय.