इतिहासाची साधने

MPSC TECH
0

 इतिहासाची साधने 

पूर्वीच्या काळातील अनेक वस्तू आजही अस्तित्वात आहेत अनेक ठिकाणी शिलालेख किवां गुहांमध्ये कोरून ठेवलेले लेख सापडले आहेत. या साधनांच्या मदतीने आपल्याला इतिहास समजतो. तसेच चालीरीती, परंपरा, लोककला, लोकसाहित्य, ऐतिहासिक कागदपत्रे यांच्या माध्यमातून इतिहास समजतो. या सर्वाना इतिहासाची साधने म्हणतात. इतिहासाची साधने तीन प्रकारात विभागली आहेत.

१ भौतिक साधने

२ लिखित साधने

3 मौखिक साधने

१ भौतिक साधने  पूर्वीच्या काळातील लोकांनी वापरलेल्या वस्तूवरून आपल्याला इतिहास समजतो या विविध वस्तूनाच भौतिक साधने म्हणतात यामध्ये प्रमुख्याने पुरातन भांडी, दागदागिने घर , इमारतींच्या अवशेषावरून मानवी समाजाच्या परस्पर संबंधाची माहिती मिळते. तर धान्य, फळाच्या बिया आणि प्राण्यांची हाडे यावरून आहाराची माहिती मिळते.

२ लिखित साधने अश्मयुगातील माणसाने त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आणि भावना चित्रातून व्यक्त केल्या आहेत सुरुवातीच्या काळात खापरे, कच्चा विटा, झाडाची साल, भूर्जपत्रे यासारख्या साहित्याचा लिहिण्यासाठी उपयोग केला जाई. अशा प्रकारच्या साहित्यावरील मजकूर एखाद्या अणकुचीदार साधनाने कोरलेला असे. अनेक राजांनी आपल्या आज्ञा , निवाडे,दानपत्रे दगडावर किवा तांब्याच्या पत्र्यावर कोरून ठेवली आहेत. धार्मिक सामाजिक स्वरूपाचे ग्रंथ , नाटके , काव्य प्रवासवर्णन तसेच यावरून इतिहास समजण्यास मदत होते या सर्व साधनांना इतिहासाची लिखित साधने म्हणतात.

मौखिक साधने

ओव्या , लोकगीते, लोककथा यांसारखे साहित्य लिहून ठेवलेले नसते. त्याचा कर्ता अज्ञात असतो. ते

पिढ्यान् पिढ्या जतन झालेले असते. अशा साहित्याला मौखिक परंपरेने जतन झालेले साहित्य असे

म्हणतात. ओव्या , लोकगीते, लोककला यांसारखे लोकसाहित्या चे प्रकार यांचा त्यात समावेश होतो.

अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधने म्हणतात.

प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने

अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या आठव्या शतकापर्यंतचा कालखंड हा भारताच्या इतिहासाचा

प्राचीन कालखंड मानला जातो. भारतातील अश्मयुगाविषयीची माहिती पुरातत्त्वीय उत्खननांतून मिळते. त्या काळात लिपीचा विकास झाला नव्हता. इ. स. पू. १५०० पासूनच्या प्राचीन इतिहासा विषयीची माहिती वेदवाङमय यातून मिळते. सुरुवातीस वेद हे लिखित नव्हते. ते मुखोद्गत करण्याचे तंत्र प्राचीन

भारतीयांनी वि कसि त केले होते. कालांतराने वेदांचे लेखन झाले. वेद वाडमय व त्या नंतर लिहिले गेलेले साहित्य हे प्राचीन भारतीय इतिहासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. यामध्ये ब्राह्मणग्रंथ, उपनिषदे, आरण्यके,रामायण, महाभारत ही महाकाव्ये , जैन व बौद्ध ग्रंथ, नाटके, काव्ये , शिलालेख, स्तंभालेख, परकीय प्रवाशांची प्रवासवर्णने इत्यादींचा समावेश होतो. त्याच प्रमाणे पुरातत्त्वी य उत्खननांत सापडलेल्या वस्तू ,पुरातन वास्तू , नाणी अशा अनेक भौतिक साधनांच्या मदतीने आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास समजतो.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)