पार्श्वभूमी
भारतात गव्हर्नर-जनरल पदाची निर्मिती रेग्युलेटिंग अॅक्ट १७७३ कायद्यानुसार झाली.
त्यावेळी बंगाल प्रांत असल्याने न्यायालयाने नियुक्त संचालक मंडळाने अर्थात, ईस्ट इंडिया कंपनीच्या न्यायालयाने बंगालचा गव्हर्नर जनरल या पदाची निर्मिती केली.
१७७३ च्या नियमन अधिनियमाने फोर्ट विल्यम ऑफ प्रेसीडेंसीचे गव्हर्नर जनरल / बंगालचे गव्हर्नर जनरल या उपाधीने ईस्ट इंडिया कंपनी च्या कोर्टाचे संचालक नियुक्त करण्यासाठी एक कार्यालय तयार केले. ज्याद्वारे न्यायालयाचे संचालक नियुक्त केले गेले.
चार्टर अॅक्ट १८३३ द्वारे बंगालचा गवर्नर जनरल ऐवजी त्याला आता भारताचा गर्वनर जनरल केले
गव्हर्नर जनरलला मदत करण्यासाठी फोर कौन्सिल ऑफ इंडिया (भारतातील) ची स्थापना करण्यात आली
१७७३-१७८४ दरम्यान गव्हर्नर जनरलवर या कौन्सिल / परिषदेचा निर्णय बंधनकारक होता.
१८५७ च्या भारतीय विद्रोहानंतर कंपनीची सत्ता संपुष्टात आली आणि ब्रिटन च्या राणी ची सत्ता भारतात प्रस्थापित झाली
भारत सरकार अधिनियम १८५८ मध्ये भारताचे राज्य सचिव कार्यालय तयार केले गेले.
१८५८ च्या भारत सरकारचा कायदा लागू केल्यावर, भारताच्या गव्हर्नर जनरल ला व्हायसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले.
१८५८ च्या घोषणेने लॉर्ड कॅनिंगला "पहिला व्हाईसरॉय झाला,
बंगालचे गव्हर्नर्स
रॉबट क्लाइव्ह (1757-1760)
जन्म :२९ सिंतबर, १७२५ (स्टाएच, ईंग्लंड)
हा भारतातील ब्रिटीश साम्राज्याचे संस्थापक आणि इस्ट इंडिया कंपनी द्वारे नियुक्ती होणारा पहिला गवर्नर होता
याच्या कारकिर्दीत हा दोन वेळेस बंगालचा गवर्नर झाला पहिल्या वेळेस हा इ.स. 1757-1760 या कालावधीत तर दुसऱ्या वेळेस 1765-1767 बंगालचा गवर्नर झाला.
रॉबर्ट क्लाइव्हने बंगालमधील ब्रिटीशांची स्थिती सुधारली आणि ब्रिटीश साम्राज्याला बळकटी दिली.
१७५६ मध्ये सेंट फोर्ट डेविड चा गर्वनर म्हणून नियुक्ती झाली.या सोबतच त्याला सेनेचे लेफ्टिनेंट कर्नल हे पद देण्यात आले.
१८५७ मध्ये झालेल्या प्लासीच्या युद्धाचे नेतृत्व केले ज्यामध्ये ब्रिटीशांना विजय मिळाला.
१७५९ झालेल्या इंग्रज व फ्रान्स यांच्या मध्ये झालेल्या युद्धात याच्या नेतृत्वात ब्रिटीशांनी फ्रान्सचा पराभव केला
1764 बक्सरच्या युद्धात विजय मिळवला.हे युद्ध बंगालचा नवाब मीर कासिम, अवधचा नवाब सुजाद्दौला आणि मोगल शासक शाह आलम दुसरा यांची संयुक्त सेना आणि ब्रिटीश यांच्या मध्ये झाले.
१७६५-१७६७ या कालावधीत रॉबर्ट कलाइव्ह पुन्हा बंगालचे गव्हर्नर म्हणून आला.त्यावेळी अवध नवाब व शहाआलम यांच्या सोबत अलाहाबादचा तह केला.
बंगालमध्ये दुहेरी शासन पद्धत सुरु केली .
याने कंपनीच्या कामगारांसाठी 'सोसायटी ऑफ ट्रेड' ची स्थापना केली, ज्यामुळे मीठ, सुपारी आणि तंबाखू च्या व्यवसायात कंपनीची मक्तेदारी स्थापित झाली
वॉरेन हेस्टिंग्ज (1774-1785)
वॉरेन हेस्टिंग्ज हे बंगालचे पहिले ब्रिटिश गव्हर्नर जनरल होते
जन्म : ६ डिसेंबर १७३२,
भाषा : हेस्टिंग्सला – अरबी व फारसी माहिती असून तो बंगाली ही बोलायचा
1773 च्या 'रेग्युलेटिंग एक्ट' द्वारे याला 1774 मध्ये बंगालच्या गर्वनर-जनरल पदावर याला कंपनीने नियुक्त केले.
वॉरन हेस्टिंग्ज जेव्हा भारतात आला. त्या वेळी कंपनीची आर्थिक स्थिती खूप खालावली होती. खजिना रिकामा पडला होता. कंपनीच्या अधिकाऱ्यात लाचलुचपत वाढली होती. बंगालमध्ये अराजकाता वाढली होती. याने भारतात आल्या नंतर प्रशासना मध्ये अनेक बदल केले आधी कंपनी बंगालच्या नवाबाला वर्षाकाठी 53 लाख रुपये द्यायची, ही रक्कम कमी करून 16 लाख रुपये करण्यात आली. आर्थिक कारभार सोयीसाठी याने आपले मुख्य कार्यालय मुर्शिदाबादहून कलकत्ता येथे हलविले आले. त्याव्यतिरिक्त, हेस्टिंग्जने मोगल बादशाहांना देण्यात येणारी २६ लाखांची रक्कम पूर्णपणे बंद केली. ‘कोड ऑफ जिन्ह लॉ’ नावाचे कायदेविषयक पुस्तक लिहिले ज्या मध्ये हिंदू व मुस्लिम कायद्यांचे संकलन केलेले होते. याच्याच काळात कंपनीला मीठ बनवण्याचा अधिकार मिळाला त्याने चार्ल्स विल्किन्सनचं याने केलेल्या प्रथम भागवत गीतेच्या अनुवादाला प्रस्तावना लिहिली. याने विवाहकर बंद केले. तसेच गुलामगिरीची प्रथा समाप्त केली. कर वसुलीसाठी याने कर समिती / रेव्हेन्यू बोर्ड स्थापन केली. कर गोळा करण्यासाठी कलेक्टर या अधिकाऱ्याची तर वसुलीसाठी अमिल या भारतीय कर्मचाऱ्याची नियुक्ती केली. याने कलाइव्ह ची दुहेरी शासन पद्धत बंद केली . कलकत्त्यात सरकारी टंकसाळ सुरु करण्यात आली. पण याने केलेल्या कागदी चलनाचा प्रयोग अयशस्वी झाला. इंग्रज अधिकाऱ्यांच्या मदतीसाठी डिव्हिजनला दिवाण व जिल्ह्याला नायब दिवाण नियुक्त याने कंपनी अधिकाऱ्यांना त्याच्या वैयक्तिक व्यापाराला देण्यात येणारी कर सवलत बंद केली.
इतर महत्वाची माहिती
१७७४ ला झालेल्या रोहिला विरुध्द च्या युद्धात रोहील्याचा बिमोड (पराभव) केला
१७७४ ला याने सर्व जिल्हाचे सहा विभाग केले. प्रत्येक विभागाला एक कर समिती / परिषद नेमली . जिचा अध्यक्ष कलकत्ता कौन्सिलचे सदस्य असायचा. हि परिषद कर व त्यासंबंधी बाबींवर निर्णय घेई.
१७७८ बनारसचा ‘ राजा चेतसिंह’ प्रकरण याला आवश्यकता नसताना पैशाची मागणी केल्या मुळे याच्या वर , हेस्टिंग्स वर ब्रिटनमध्ये महाभियोग चालविण्यात आला पण नंतर त्याला दोषमुक्त करण्यात आले
1775 मध्ये एका बंगाली ब्राह्मण 'नन्द कुमार' याने वारेन हेस्टिंग्स वर आरोप केला कि, त्याने 'मुन्नी बेगम' (मीर ज़ाफ़र ची विधवा पत्नी) कडून नवाबाचे संरक्षक करण्यासाठी साठी 3.5 लाख रुपये लाच घेतली. पण हा आरोप सिद्ध होवू शकला नाही या नंतर त्याने नंद कुमार याच्या वर अनेक खोटे गुन्हे लावून जेलमध्ये टाकले व शेवटी त्याला फाशी दिली.
याने महसूल वसुलीचे अधिकार लिलाव पद्धतीने सुरु केले. जो जास्त कर वसूल करेल त्याला ५ वर्षासाठी हा कालावधी निश्चित केला, नंतर १७७७ ला तो कालावधी एक वर्षाचा केला गेला.
1784 मध्ये यांच्या काळात 'द एशियाटिक सोसायटी ऑफ़ बंगाल' ची स्थापना करण्यात आली.
१७८१ मध्ये याने कलकत्ता मदरसाची स्थापना केली
याने १७८१ चा अधिनियम नुसार गर्व्हर्नर जनरल इन कौन्सिल व कलकत्ता सर्वोच्च न्यायालय यांच्या अधिकार क्षेत्राचे स्पष्ट विभाजन केले .
१७८१ ला डिव्हिजन कॉन्सिल बंद केले . आणि कलेक्टर ला कर वसुली अधिकार दिला
(१७७८ -८२) या काळात झालेल्या पहिल्या मराठ्या विरुद्ध झालेल्या युद्धात इंग्रजाचा पराभव झाला आणि याला सालबाईचा तह करणे भाग पडले
याच्याच कारकिर्दीत (१७८०-८४) या काळात दुसरे इंग्रज व म्हैसूर युद्ध झाले या युद्धा नंतर मंगलोरचा करार करण्यात आला. १७८४ साली झालेल्या मंगलोरच्या तहाने इंग्रजांना फारसा फायदा न होता हे युध्द थांबले.