महिलांच्या सुरक्षितेसाठी शहरात ‘वन स्टॉप सेंटर’ची संख्या वाढविणार

MPSC TECH
0

महिलांच्या सुरक्षितेसाठी शहरात ‘वन स्टॉप सेंटर’ची संख्या वाढविणार

मुंबई उपनगर, औरंगाबाद, नाशिक, नागपूर व ठाणे या शहरांसाठी प्रत्येकी एक अशी पाच अतिरिक्त ‘वन स्टॉप सेंटर्स’ सुरू करण्यात येणार आहेत.

महाराष्ट्रातील ‘वन स्टॉप सेंटर’ची संख्या ३७ वरून ४२ होणार

संकटग्रस्त महिलांना खाजगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही ठिकाणी एकाच छताखाली मदत उपलब्ध करणे, वैद्यकीय, कायदेशीर सुविधा देण्याच्या उद्देशाने राज्यात जिल्हानिहाय ‘वन स्टॉप सेंटर’ ही योजना सुरू करण्यात आली. मात्र वाढती लोकसंख्या आणि महिलांकडून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन या केंद्राचा विस्तार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार आता मुंबई उपनगर, औरंगाबाद, नाशिक, नागपूर व ठाणे या शहरांसाठी प्रत्येकी एक अशी पाच अतिरिक्त ‘वन स्टॉप सेंटर्स’ सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे या केंद्रांची संख्या ३७ वरून ४२ इतकी होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)