देशातील 28 हजार उद्योगांची पर्यावरण नियमांना बगल

MPSC TECH
0

 


देशातील 28 हजार उद्योगांची पर्यावरण नियमांना बगल

गेल्या तीन वर्षांत देशभरातील एकूण 28 हजार 166 उद्योगांनी पर्यावरणविषयक निकषांचे उल्लंघन केले असून त्यात महाराष्ट्रातील 3,042 उद्योगांचा समावेश आहे . केंद्रीय पर्यावरण, वन मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. उद्योग आणि पर्यावरणाचे संतुलन साधण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जातात.  द्योगां कडून नियमभंग होत असल्याचे आढळल्यास राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळांमार्फत कारवाई केली जाते.

देशभरातील मंडळांकडून मागविण्यात आलेल्या तपशिलानुसार मागील तीन वर्षांत 28 हजार 166 उद्योगांनी पर्यारणीय निकषांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे. यापैकी 18 हजार 941 उद्योगांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून 2,616  उद्योग बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 158 उद्योगांच्या विरोधात खटले दाखल करण्यात आले आहे. राज्यात 88,505 उद्योग असून त्यापैकी 86 हजार 854  सुरू आहेत. यापैकी 3,034 उद्योगांनी पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन केले. यातील 2,167 उद्योगांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. 668 उद्योग बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून 208 उद्योगांवर कारवाई सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)