टेलिग्राम अन् डार्क वेबमुळे सहज उपलब्ध होतंय ड्रग्स; रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा!

MPSC TECH
0

 

टेलिग्राम अन् डार्क वेबमुळे सहज उपलब्ध होतंय ड्रग्स; रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा!

टेलिग्राम आणि अशाच इतर मेसेजिंग अ‍ॅप्सचा वापर हा अमली पदार्थांच्या तस्करीसाठी होत असल्याचं एका रिपोर्टमध्ये समोर आलं आहे. या कामासाठी डार्क वेबचा वापरही होत असल्याचं या अहवालात म्हटलं आहे . इंडिया फ्युचर फाऊंडेशनने हा रिपोर्ट पब्लिश केला आहे.अमली पदार्थांची तस्करी ही एक बिलियन इंडस्ट्री आहे. या व्यवसायातील बडे मासे हे अमली पदार्थांचं व्यसन लागलेल्या किंवा पैशांची गरज असणाऱ्या व्यक्तींना या जाळ्यात ओढतात. अशाच प्रकारे लोकांची मोठी साखळी तयार होऊन, ड्रग्सची हातोहात तस्करी केली जाते.

डार्क वेबचा वापर

इंटरनेटचा एक मोठा भाग हा सामान्यांपासून नेहमीच लपून राहतो. याला 'डार्क वेब' म्हणतात. टॉर आणि तशाच अन्य काही ब्राऊजर्सच्या मदतीने याठिकाणी सर्फिंग करता येतं. सामान्य ब्राउजर आणि सर्व्हरवरुन, विशेषतः गुगलवरुन डार्क वेब अ‍ॅक्सेस करता येत नाही; त्यामुळेच अवैध गोष्टींची खरेदी-विक्री करण्यासाठी याचा वापर केला जातो.

हेरॉईन, एलएसडी अशा अमली पदार्थांच्या तस्करीसाठी डार्क वेबचा वापर हे आपल्यासमोरील मोठं आव्हान असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे . दि डार्क मार्केट, दि पीपल्स ड्रग स्टोअर, ब्लॅक मार्केट आणि सिल्क रोड अशा वेब मार्केट्सचा यात उल्लेख आहे. अमली पदार्थांच्या जवळपास प्रत्येक प्रकारासाठी याठिकाणी विशिष्ट मार्केट उपलब्ध असल्याचं यात म्हटलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)