१८ वर्षांखालील मुलांचं ‘लिव्ह इन रिलेशन’ अनैतिक; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
अलाहाबाद उच्च न्यायालयाने ‘लिव्ह इन रिलेशन’बाबत मोठा निर्णय दिला आहे. १८ वर्षांखालील मुलांना ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये राहता येणार नाही. १८ वर्षांखालील मुलांचं ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणं केवळ अनैतिक नव्हे तर बेकायदेशीरही आहे. त्यामुळे ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलांना कोणत्याही प्रकारची कायदेशीर सुरक्षितता देता येणार नाही, असा निर्णय न्यायालयाने दिला.
‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणारी व्यक्ती विवाहयोग्य वयाची (२१ वर्षे) नसली तरीही चालेल, पण ती १८ वर्षांपेक्षा अधिक वयाची असणं गरजेचं आहे, असंही न्यायालयाने म्हटलं. न्यायमूर्ती विवेक कुमार बिर्ला आणि न्यायमूर्ती राजेंद्र कुमार-चतुर्थ यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.