समृद्धी महामार्गावर मृतांच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून महामार्गावर महामृत्युंजय यंत्र बसवण्यात आले.

MPSC TECH
0

 

Samruddhi Mahamarg

समृद्धी महामार्गावर खासगी बसला झालेल्या अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता या मृतांच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून महामार्गावर  चक्क महामृत्युंजय यंत्र बसवण्यात आले एवढेच नव्हे तर महामृत्युंजय मंत्राचा सव्वाकोटी जपही करण्यात आला. एकीकडे अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी शास्त्रीय उपाययोजना करण्यात येत असतानाच महामृत्युंजय यंत्राची स्थापना करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामार्फत महामृत्युंजय यंत्र बसवण्यात आले आहे. यामुळे आजूबाजूच्या पाच-दहा किलोमीटरमध्ये अपघात होणार नाही तसेच अपघात झाला तर मृत्यू होणार नाही, असा दावा स्वामी समर्थ सेवा केंद्र समन्वयकांनी केला आहे. दैवीशक्तीचा दावा करणे आणि त्यातून लोकांना फसवणे, ठगवणे हा जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा आहे. बुलढाणा पोलीस अधीक्षकांनी यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी केली आहे. स्वामी समर्थ साधकांनीदेखील याचा निषेध करणे आवश्यक आहे, असेही डॉ. दाभोलकर यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)