युपीएससीद्वारे ‘या’ पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या शेवटची तारीख अन् अर्जाची प्रक्रिया
UPSC recruitment 2023: संघ लोकसेवा आयोगाने (UPSC) उपसंचालक(Deputy Director), सहायक संचालक(Assistant Director), सहाय्यक प्राध्यापक(Assistant Professor) आणि इतर पदांच्या विविध पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. अर्जाची प्रक्रिया आज, २६ ऑगस्टला सुरू झाली आणि अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १४ सप्टेंबर आहे. इच्छुक उमेदवार upsconline.nic.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात
UPSC भरती २०२३ भरतीचे तपशील:
२९ रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम राबविण्यात येत आहे.
UPSC भरती २०२३ रिक्त जागा तपशील:
स्पेशलिस्ट ग्रेड III सहाय्यक प्राध्यापक (हृदयविज्ञान): ०९
सहाय्यक संचालक जनगणना संचालन (तांत्रिक): ०९
उपसंचालक: १०
सहाय्यक प्राध्यापक (वनस्पतिशास्त्र): ०१
सहाय्यक प्राध्यापक (रसायनशास्त्र): ०१
सहाय्यक प्राध्यापक (इंग्रजी): ०३
सहाय्यक प्राध्यापक (हिंदी): ०१
सहाय्यक प्राध्यापक (इतिहास): ०१
सहाय्यक प्राध्यापक (गणित): ०१
UPSC भरती २०२३ अर्ज शुल्क:
उमेदवारांना २५ रुपये अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे. SC/ST/PwBD/महिला उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही. सहाय्यक प्राध्यापक (तमिळ): ०१
अर्ज करण्यासाठी थेट लिंक -https://upsconline.nic.in/ora/VacancyNoticePub.php
अर्ज कसा करायचा.
www.upsconline.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
होमपेजवर “विविध भरती पदांसाठी ऑनलाइन भरती अर्ज (ORA)” वर क्लिक करा.
स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल
अर्ज भरा
अर्ज शुल्क भरा
सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
फॉर्म सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट घ्या.