पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पुरस्काराची रक्कम ‘नमामि गंगे’ प्रकल्पाला

MPSC TECH
0

 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पुरस्काराची रक्कम ‘नमामि गंगे’ प्रकल्पाला

लोकमान्य टिळक म्हणजे स्वातंत्र्याच्या इतिहासाच्या माथ्यावरचा टिळा आहे. त्यांच्या नावाने मला पुरस्कार मिळाल्याने माझी जबाबदारी कैक पटींनी वाढली आहे, असे नमूद करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देशवासीयांना समर्पित केला. पुरस्काराची रक्कम त्यांनीनमामि गंगे’ प्रकल्पाला देण्याची घोषणा केली.

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यपाल रमेश बैस, ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे, रोहित टिळक, प्रणती टिळक आणि गीताली टिळक या वेळी व्यासपीठावर होते.

देशातील पहिला सर्जिकल स्ट्राइक पुण्यात

देशात अनेक राजे-राजवाडे होऊन गेले, त्यांचे संस्थान त्यांच्या नावाने ओळखले जायचे. शिवछत्रपतींचे काम वेगळय़ा दिशेने झाले. शिवछत्रपतींनी रयतेचे स्वराज्य उभे करण्याचे काम पुणे शहरात केले. तो पुण्याच्या गौरवशाली इतिहासाचा भाग आहे. जवानांनी देशाचे रक्षण करण्यासाठी लक्ष्यभेद म्हणजेच ‘सर्जिकल स्ट्राइक’ केला होता. पण, लाल महालाचा ताबा घेण्याचा प्रयत्न शाहिस्तेखानाने केला तेव्हा या देशातील पहिला सर्जिकल स्ट्राइक छत्रपती शिवाजीमहाराज यांनी केला, असे शरद पवार

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)