निर्भयाला न्याय मिळवून देणाऱ्या वकिलांची ब्रिजभूषण सिंह खटल्यात एन्ट्री

MPSC TECH
0

 

विधीज्ञ राजीव मोहन

 निर्भयाला न्याय मिळवून देणाऱ्या वकिलांची ब्रिजभूषण सिंह खटल्यात एन्ट्री

भाजपा खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांना दिल्लीतल्या राऊज अव्हेन्यू न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात न्यायालयाने ब्रिजभूषण यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. सहा महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. याप्रकरणी कुस्ती महासंघाचे सचिव विनोद तोमर यांचाही जामीन मंजूर झाला आहे. दोघांविरोधात महिला कुस्तीपटूंनी केलेल्या तक्रारींनुसार आरोपत्र दाखल करण्यात आलं आहे. ब्रिजभूषण यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, यासाठी कुस्तीपटूंनी अनेक दिवस दिल्लीत आंदोलन केलं. मोठ्या लढाईनंतर याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन हे प्रकरण आता न्यायालयात पोहोचलं आहे.

ब्रिजभूषण सिंह यांचा अंतरिम जामीन न्यायालयाने मंगळवारी मंजूर केला. ब्रिजभूषण सिंह यांच्या वतीने विधीज्ञ राजीव मोहन यांनी न्यायालयात बाजू मांडत जामिनाची मागणी केली होती. राजीव मोहन हे प्रसिद्ध वकील असून ते निर्भया खटल्याच्या वेळी पहिल्यांदा प्रसिद्धीझोतात आले होते. तेव्हा त्यांनी सरकारी वकील म्हणून निर्भयाची बाजू मांडली होती. त्यावेळी राजीव मोहन यांनी दोषींना फाशी व्हावी, अशी मागणी न्यायलयासमोर केली होती. तेच राजीव मोहन आता ब्रिजभूषण सिंह यांची बाजू मांडत आहेत.

निर्भया प्रकरण हे एक ऐतिहासिक प्रकरण आहे. या प्रकरणाची देशभर चर्चा झाली होती. निर्भया प्रकरणात 4 आरोपींना दोषी ठरवण्यात आलं आणि मार्च 2020 मध्ये त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्यावेळी राजीव मोहन प्रसिद्धीझोतात आले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)