विराट कोहलीने 500व्या सामन्यात केला मोठा विक्रम

MPSC TECH
0

 

विराट कोहली

विराट कोहलीने 500व्या सामन्यात केला मोठा विक्रम

त्रिनिदाद येथे भारत आणि वेस्ट इंडिज संघांतील दुसरा कसोटी सामना खेळला गेला हा दोन्ही संघांतील 100वा कसोटी सामना होता. त्याचबरोबर विराट कोहलीचा आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 500वा सामना होता. विराट कोहलीने आतापर्यंत अनेक विक्रम केले आहेत. तसेच विराटच्या 500 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यातही विक्रमांची ही मालिका थांबली नाही. विराटने या खास सामन्यात असा पराक्रम केला आहे, जो जगातील कोणताही फलंदाज करू शकला नाही. विराटने 161 चेंडूंचा सामना करताना 8 चौकारांच्या मदतीने नाबाद 87 धावा केल्या आहेत. त्यामुळे विराट आपल्या 500 व्या सामन्यात अर्धशतक करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. विराटपूर्वी 500 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या जगातील एकाही खेळाडूला अर्धशतक झळकवता आले नाही. विराटच्या कसोटी कारकिर्दीतील हे 30 वे अर्धशतक आहे.

सचिननंतर विराट कोहलीच्या नावावर आहे हा विक्रम –

भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये 100 हून अधिक सामने खेळणारा विराट कोहली हा एकमेव फलंदाज आहे. सचिन तेंडुलकरनंतर क्रिकेट विश्वात सर्वाधिक शतके करणारा तो खेळाडू आहे. त्याने 75 शतके ठोकली आहेत. कोहलीने भारतासाठी कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक 7 द्विशतके झळकावली आहेत. त्याचबरोबर कर्णधार म्हणून तो भारतासाठी सर्वाधिक कसोटी सामना जिंकणारा खेळाडू आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने 40 कसोटी सामने जिंकले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)