पदार्पणात शतक ठोकत यशस्वी जैस्वालने रचला इतिहास !

MPSC TECH
0

 

दार्पणात शतक ठोकत यशस्वी जैस्वालने रचला इतिहास !

यशस्वी जैस्वालने पहिल्या डावात शतक झळकावून इतिहास रचला. 21 वर्षीय युवा फलंदाजाने भारताबाहेर पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावले. वेस्ट इंडिजमध्ये पदार्पणात शतक झळकावणारा तो पहिला भारतीय सलामीवीर ठरला आहे. त्यांच्या आधी सुनील गावसकर यांनी 1971 साली वेस्ट इंडिजमध्ये पदार्पण केले होते, परंतु पहिल्या सामन्यात त्यांना शतक झळकावण्यात अपयश आले होते.

परदेशी भूमीवर शतक झळकावणारा पहिला भारतीय सलामीवीर

परदेशी भूमीवर सलामीवीर म्हणून शतक झळकावणारा यशस्वी पहिला भारतीय ठरला आहे. यापूर्वी सुधीर नाईकने इंग्लंडमध्ये 1974 मध्ये 77 धावा केल्या होत्या. तर सुनील गावसकर यांनी पदार्पणाच्या डावात 65 धावा केल्या. यशस्वीने सर्वांना मागे टाकले आहे. एकंदरीत शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी पदार्पणाच्या कसोटीत सलामीवीर म्हणून शतके झळकावली आहेत पण हे शतक मायदेशातील कसोटी मालिकेत आले आहेत.

याशिवाय पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावणारा यशस्वी एकूण भारतीयांपैकी 17वा फलंदाज ठरला आहे. म्हणजेच त्याच्या आधी भारताच्या 16 फलंदाजांनी पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावले आहे.

21 वर्षीय युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने पदार्पणातच शतक ठोकून इतिहास रचला. खरे तर फार कमी भारतीय खेळाडूंनी भारताबाहेर पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावले आहे. आता त्या यादीत यशस्वी जैस्वालचेही नाव जोडले गेले आहे. जैस्वालच्या आधी सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, सुरेश रैना, अब्बास अली बेग, प्रवीण अमरे आणि सुरिंदर अमरनाथ यांनी ही कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारा जयस्वाल आता सातवा खेळाडू ठरला आहे.

इतर माहिती

कसोटी पदार्पणात शतक झळकावणारे  सर्वात तरुण भारतीय

18 वर्षे 329 दिवस            पृथ्वी शॉ                         विरुद्ध वेस्ट इंडिज            राजकोट             2018

20 वर्षे 126 दिवस            अब्बास अली बेग              विरुद्ध इंग्लंड,                  ओल्ड ट्रॅफर्ड        1959

20 वर्षे 276 दिवस            गुंडप्पा विश्वनाथ                विरुद्ध ऑस्ट्रेलिया            कानपूर               1969

21 वर्षे 196 दिवस            यशस्वी जैस्वाल               विरुद्ध वेस्ट इंडिज            रॉसिओ              2023

21 वर्षे 327 दिवस            मोहम्मद अझरुद्दीन            विरुद्ध इंग्लंड                   कोलकाता           1984

वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पणात भारतीय शतक

117                  रोहित शर्मा          कोलकाता           2013

134                  पृथ्वी                 राजकोट             2018

143*                  यशस्वी जैस्वाल रॉसिओ              2023

पदार्पण करताच सचिनचा विक्रम मोडला गेला

यशस्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये 80.21च्या मजबूत सरासरीसह टीम इंडियामध्ये कसोटी पदार्पण करणारा तिसरा फलंदाज बनला आहे. जेव्हा सचिनने भारतीय संघाकडून कसोटी पदार्पण केले होते. त्यावेळी त्याची स्थानिक क्रिकेटमध्ये सरासरी 70.18 होती. स्थानिक क्रिकेटमध्ये 88.37च्या सरासरीने सर्वाधिक धावा करून कसोटी पदार्पण करण्याचा विक्रम विनोद कांबळीच्या नावावर आहे.

रोहित-यशस्वी जोडीने मोडला 22 वर्षे जुना विक्रम, गावसकर आणि सेहवागला मागे टाकले

वेस्ट इंडिजच्या भूमीवर शतकी भागीदारी करणारी रोहित यशस्वी ही 2006 नंतर पहिली सलामीची जोडी ठरली. कॅरेबियनमध्ये केवळ चार भारतीय सलामी जोडींनी शतकी भागीदारी केली आहे.

वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत  प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या डावात 150 धावांवर सर्वबाद झाला, त्याला प्रत्युत्तरात भारताने दोन गडी गमावून 312 धावा केल्या. टीम इंडियाच्या डावाची सुरुवात करताना कर्णधार रोहित शर्मा आणि युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल यांनी शतके झळकावली. दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 229 धावांची भागीदारी केली. शतकी खेळीसह दोन्ही सलामीवीरांनी 22 वर्षे जुना संजय बांगर आणि वीरेंद्र सेहवागची सर्वात मोठी सलामीची भागीदारीचा विक्रम मोडला विक्रम मोडला. 2002 मध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सेहवाग आणि बांगर यांनी डावाची सुरुवात केली आणि 201 धावांची भागीदारी केली. आणि 13 जुलै रोजी रोहित आणि यशस्वीने मिळून हा विक्रम मोडला.

इतर माहिती

वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय सलामीची सर्वात मोठी भागीदारी

209*                 रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल,              रॉसियो,              2023

201                  वीरेंद्र सेहवाग आणि संजय बांगर                   मुंबई वानखेडे       2002

159                  वीरेंद्र सेहवाग आणि वसीम जाफर                 ग्रॉस आइलेट       2006

153                  सुनील गावसकर आणि चेतन चौहान             मुंबई वानखेडे       1978

136                  सुनील गावसकर आणि अंशुमन गायकवाड      किंग्स्टन                         1976


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)