१५० सरकारी पदांसाठी भरती
केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाव्यतिरिक्तही अनेक महत्त्वाच्या, भरपूर पगार व प्रतिष्ठा असणाऱ्या नोकऱ्या आहेत. त्यासाठी जर प्रयत्न केले तर सुशिक्षित पदवीधरांना नव्या वाटा, नवीन संधीतून आयुष्याचे सोने करता येणे शक्य आहे.
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) कडून नुकतीच सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या (ग्रेड अ) भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तब्बल १५० जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. अनुसूचित जाती, जमाती आणि अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्जाचे शुल्क १५० रुपये असून इतरांसाठी ८०० रुपये परीक्षा शुल्क आहे. पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय २१ वर्षे तर कमाल वय ३० वर्षे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सूट आहे.