फ्रान्समध्ये वाईनची विल्हेवाट लावण्यासाठी सरकारने दिले कोट्यवधी रुपये

MPSC TECH
0

 


फ्रान्समध्ये वाईनची विल्हेवाट लावण्यासाठी सरकारने दिले कोट्यवधी रुपये

फ्रान्समध्ये वाईनचा व्यवसाय संकटात सापडला आहे. वाईनची विक्री कमी झाल्याने किमती घसरल्या आहेत. परिणामी युरोपिअन युनियने अतिरिक्त वाईन नष्ट करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी फ्रान्सला 1400 कोटी रुपये दिले आहेत. तर फ्रान्स सरकारने ही रक्कम 1700 कोटीपर्यंत वाढवली आहे.

फ्रान्समध्ये क्राफ्ट बिअरची लोकप्रियता वाढली आहे. महागाई आणि वाईनचे झालेले अतिरिक्त उत्पादन यामुळे फ्रान्सच्या वाईनवर अधिशेष लावण्यात आला आहे. यामुळे 34 टक्क्यांनी वाईनची विक्री कमी झाली आहे. ही अतिरिक्त वाइन आता हँड सॅनिटायझर, साफसफाईची उत्पादने आणि परफ्यूम यासारख्या वस्तूंमध्ये वापरली जाणार आहेत. यासाठी फ्रेंच सरकारकडून व्यावसियाकांना 1700 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे.   

युरोपियन कमिशनचा जून ते वर्षाचा डेटा असे दर्शवितो की, वाइनचा वापर इटलीमध्ये 7 टक्के, स्पेनमध्ये 10 टक्के, फ्रान्समध्ये 15 टक्के, जर्मनीमध्ये 22 टक्के आणि पोर्तुगालमध्ये 34 टक्के कमी झाला आहे.

 

चालू घडामोडी च्या सखोल अभ्यासासाठी आजच वाचा : Bullet Point (E-Book) 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)