भाजपाला शह देण्यासाठी ममता बॅनर्जींची ‘माँ, माटी’ रणनीती

MPSC TECH
0

 


भाजपाला शह देण्यासाठी ममता बॅनर्जींची ‘माँ, माटी’ रणनीती

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा सरकारला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी आघाडी केली आहे. या आघाडीत पश्चिम बंगालमध्ये सत्तेत असललेल्या तृणमूल काँग्रेस या पक्षाचाही समावेश आहे. या पक्षाने भाजपाशी दोन हात करण्यासाठी खास रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा पक्ष प्रादेशिक अस्मितेचा आधार घेत आहे. या पक्षाकडून माँ, माटी आणि माणूस’ फॉर्म्युल्याचा वापर केला जातोय.

पश्चिम बंगाल दिन

पश्चिम बंगालमध्ये 22 ऑगस्टपासून पावसाळी अधिवेशानाच्या दुसऱ्या सत्रास सुरुवात झाली आहे. या अधिवेशनादरम्यान एक विधेयक सादर केले जाणार आहे. या विधेयकानुसार पश्चिम बंगालमध्ये 15 एप्रिल हा ‘पश्चिम बंगाल दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. 15 एप्रिल हा दिवस बंगाली नववर्ष आहे. महाराष्ट्राप्रमाणेच पश्चिम बंगालदेखील लवकरच आपले स्वत:चे राज्यगीत निश्चित करणार आहे. त्याचाही प्रस्ताव ठेवला जाण्याची शक्यता आहे.

या आधी पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी राजभवनात 20 जून हा दिवस पश्चिम बंगाल स्थापना दिन म्हणून साजरा केला होता. याआधी साधारण वर्षभरापूर्वी भाजपाने हा दिवस संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये साजरा केला जावा, अशी मागणी याआधी केली होती. तर दुसरीकडे ममता बॅनर्जी सरकारने यावर तीव्र आक्षेप व्यक्त केला होता. राज्यपालांनी स्वत:च हा निर्णय घेतला असून राज्य सरकारची ही भूमिका नाही, असे ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले होते.

तृणमूल काँग्रेसची भूमिका

पश्चिम बंगाल दिन साजरा करण्याच्या मुद्द्यावरून तेव्हा राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा वाद पाहायला मिळाला होता. कारण तृणमूल काँग्रेसच्या दृष्टीने या दिवशी म्हणजेच 20 जून 1947 रोजी पश्चिम बंगाल राज्याची फाळणी झाली होती. याच दिवशी मोठा संहार झाला. अनेकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे हा दिवस पश्चिम बंगालच्या विभाजनाचे प्रतिक असल्यामुळे तो साजरा करू नये, असे तृणमूलला वाटते.

 

चालू घडामोडी च्या सखोल अभ्यासासाठी आजच वाचा : Bullet Point (E-Book) 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)