भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत जवळपास ६८० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित करण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि वयोमर्यादा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड भरती २०२३
पदाचे नाव – अप्रेंटिस
शाखा – पदवीधर, टेक्निशियन, ट्रेड
एकूण रिक्त पदे – ६८०
शैक्षणिक पात्रता –
- पदवीधर : ७० टक्के गुणांसह B.Com/ B.A/ संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.
- टेक्निशियन : ७० टक्के संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.
- ट्रेड : १० वी पास + संबंधित विषयात ITI.
अधिकृत वेबसाईट – http://bhel.com/
वयोमर्यादा –
- खुला प्रवर्ग – १८ ते २७ वर्षे.
- ओबीसी – ३ वर्षे सूट.
- मागासवर्गीय – ५ वर्षे सूट.
अर्ज फी –
खुला/ EWS/ ओबीसी / मागासवर्गीय/ PWD/ माझी सैनिक – कोणतीही फी नाही.
महत्वाच्या तारखा –
- ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – २५ नोव्हेंबर २०२३
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १ डिसेंबर २०२३