राणीबागेत पेंग्विनचे बारसे

MPSC TECH
0

 


राणीबागेत पेंग्विनचे बारसे

भायखळा येथील राणीची बाग अर्थात वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयात जन्मलेल्या पेंग्विनच्या तीन पिल्लांचे बारसे करण्यात आले. कोको, स्टेला आणि जेरी अशी नावे या तिघांची ठेवण्यात आली आहेत. तसेच यावेळी वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाचा १६१ वा वर्धापन दिन सोहळाही संपन्न झाला.या कार्यक्रमाप्रसंगी प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ.संजय त्रिपाठी आणि उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी हे उपस्थित होते.

राणीबाग हे ठिकाण

देशविदेशातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे. या प्राणी संग्रहालयात मार्च २०१७ मध्ये पेंग्विन आणल्यापासून पर्यटकांची संख्या वाढली आहे.दररोज पाच ते सहा हजार, सुटीच्या दिवशी १५ ते १६ हजार तसेच शनिवार-रविवारी पर्यटकांची संख्या २० हजारांवर जाते. त्यामुळे याआधी दररोज १५ ते २० हजारांपर्यंत मिळणारे उत्पन्न आता एक ते सहा लाखांपर्यंत गेले आहे. तर सरासरी उत्पन्न प्रतिदिवस दीड लाख तर महिन्याचे सरासरी उत्पन्न ४५ लाखांवर गेले आहे. दरम्यान, राणीबागेत नुकताच तीन पेंग्विनचा जन्म झाला होता. त्यांचे नामकरण काल झाल्याने पर्यटकांचा ओघ आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)