नौदल दिनानिमित्त 'आयएनएस मालवण' युद्ध नौकेचे जलावतरण

MPSC TECH
0

 


नौदल दिनानिमित्त 'आयएनएस मालवण' युद्ध नौकेचे जलावतरण

मालवण येथील तारकर्लीच्या समुद्रकिनारी नौदल दिनाच्या निमित्ताने सोहळ्याच्या पूर्वीच नौदलातर्फे आयएनएस मालवण या युद्ध नौकेचे बुधवारी कोचीन येथे जलावतरण करण्यात आले. या अनोख्या सन्मानामुळे मालवणला भारतीय नौदलात वेगळे स्थान प्राप्त झाले आहे.

या पाणबुडीविरोधी युद्ध नौकेच्या उभारणीचे कंत्राट सार्वजनिक क्षेत्रातील कोचीन शिपयार्ड लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे. तेथे अशा प्रकारच्या ८ युद्ध नौकांची बांधणी होत आहे. यापैकी ३ युद्ध नौकांची बांधणी पूर्ण झाली असून आयएनएस मालवणसह अन्य दोन युद्धनौकांचेही  एकाच वेळी जलावतरण झाले. या तीन युद्ध नौकांचे नाव मालवण, मंगरोल व माहे अशी आहेत. मंगरोल हे शहर गुजरातच्या किनारपट्टीवर, तर माहे हे केरळजवळ समुद्रकिनारी असलेले शहर आहे. तिन्ही युद्ध नौकांना समुद्रकिनारी असलेल्या शहरांची नावे देण्यात आली आहेत, अशी माहिती नौदलाकडून देण्यात आली.

कोचिनमध्ये झालेल्या जलावतरण सोहळ्यात दक्षिण कमांडचे प्रमुख व्हाईस अॅडमिरल सुरज बेरी यांच्या पत्नी कंगना बेरी यांच्या हस्ते मालवणचे, तर मंगरोलचे जलावतरण उपनौदल प्रमुख व्हाईस अॅडमिरल संजय सिंह यांच्या पत्नी झरीन लॉर्ड सिंह यांच्या हस्ते झाले तिसऱ्या माहे युद्धनौकेचे जलावतरण भारतीय नौदल अकादमीचे प्रमुख व्हाईस अॅडमिरल पुनीत बहल यांच्या पत्नी अंजली बहल यांच्या हस्ते करण्यात आले.

MPSC, MPSC Current, MPSC News, MPSC Study, MPSC Guidance

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)