इंडियन ऑईलमध्ये नोकरीची मोठी संधी : ४७३ जागांसाठी भरती

MPSC TECH
0

 


इंडिअन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने अप्रेंटिस संवर्गातील एकूण ४७३ रिक्त पदे भरण्यासाठी IOCL अप्रेंटिस भरती २०२४ जाहीर केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक १ फेब्रुवारी २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सादर करू शकतात. इंडियन ऑइल अंतर्गत प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ट्रेड अपरेंटिस, टेकनीशियन अपरेंटिस, डाटा एंट्री ऑपरेटर, डोमेस्टिक डाटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी एकूण ४७३ जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी इंडियन ऑइल यांच्या iocl.com या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.

पदे इंडियन ऑइल भरती २०२४ अंतर्गत प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार विविध पदासाठी एकूण ४७३ जागांसाठी भरती करण्यात येत आहे.

वयाची अट

१२ जानेवारी २०२४ तारखेस उमेदवाराचे वय विविध पदानुसार १८ – २४ वर्ष हवे. सर्व पदांच्या वयोमर्यादा साठी अधिकृत जाहिरात बघावी. वयोमर्यादेसाठी पात्र उमेदवारांना भारत शासनाच्या नियमानुसार खालील प्रमाणे सूट देण्यात आली आहे.

इतर मागासवर्गीय (OBC-Non Creamy Layer) ३ वर्ष सूट, SC/ST- ५वर्ष सूट.

IOCL भर्ती 2024 निवड प्रक्रिया: इंडियन ऑइल भरती २०२४ साठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा मार्क्सच्या मेरीटच्या आधारावर केली जाईल. निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षेचा समावेश असेल. लेखी परीक्षेत एकाधिक निवड प्रश्नांची (MCQs) असेल ज्यामध्ये एका योग्य पर्यायासह ४ पर्याय असतील. उमेदवाराने योग्य पर्याय निवडावा. लेखी परीक्षेत १०० प्रश्न असतील आणि एकूण गुण १०० असतील. प्रत्येक बरोबर उत्तराला १ गुण असेल. चुकीच्या उत्तरांसाठी निगेटिव्ह मार्किंग नसेल.

अधिकृत सुचना

इच्छुक आणि पात्र उमेदवार इंडियन ऑइल यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करू शकतात.

अर्ज कसा करावा

अर्ज भरण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

अर्ज करताना वैयक्तिक तसेच शैक्षणिक माहिती मूळ कागदपत्रानुसार भरावी.

संकेतस्थळावर उमेदवारांनी अप्रेंटिस लिंकवर क्लिक करणे आवश्यक आहे.

एक नवीन पृष्ठ पुन्हा उघडेल जिथे नोंदणी लिंक उपलब्ध असेल.

लिंकवर क्लिक करा आणि स्वतःची नोंदणी करा.

एकदा पूर्ण झाल्यावर, खात्यात लॉग इन करा आणि अर्ज भरा.

सबमिटवर क्लिक करा आणि डाउनलोड करा.

पुढील आवश्यकतेसाठी त्याची हार्ड कॉपी ठेवा.

 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)