डीमार्टचे राधाकिशन दमानी सेल्फ-मेड उद्योजकांच्या यादीत अव्वल स्थानी
रिटेल चेन डीमार्टचे संस्थापक आणि अनुभवी गुंतवणूकदार राधाकिशन दमानी यांनी मिलेनिया २०२३ च्या टॉप २०० सेल्फ- मेड उद्योजकांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. राधाकिशन यांच्या कंपनीचे बाजार भांडवल २.३८ लाख कोटी इतके आहे. या यादीत ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टचे संस्थापक बिन्नी बन्सल आणि सचिन बन्सल हे दुसऱ्या स्थानी आहेत. फ्लिपकार्टचे बाजार भांडवल १.१९ लाख कोटी आहे.
झोमॅटो कंपनीचे दीपिंदर गोयल तिसऱ्या स्थानी आहेत. त्यांचे बाजार भांडवल ८६,८३५ कोटी आहे. चौथ्या स्थानी स्विगीचे श्रीहर्ष मॅजेटी आणि नंदन रेड्डी आहेत. ड्रीम इलेव्हनचे भावित सेठ आणि हर्ष जैन पाचव्या स्थानावर आहेत. झेप्टोचे २१ वर्षीय कैवल्य व्होरा हे सेल्फ-मेड उद्योजकांमधील सर्वात तरुण उद्योजक आहेत. त्यांच्यानंतर भारतपेचे शाश्वत नकरानी (वय २५) आणि जुपीचे दिलशेर माल्ही (२७) हे सर्वात तरुण उद्योजक म्हणून ओळखले जातात. नायकाच्या फाल्गुनी नायर यांनी महिला उद्योजकांच्या यादीत अव्वल स्थानी पटकावले आहे. ममाअर्थच्या गझल अलघ आणि विन्झोच्या सौम्या सिंह राठोड या यादीतील सर्वात तरुण महिला उद्योजक आहेत.
(MPSC Study, MPSC Notes, MPSC Syllabus, Current Affairs, UPSC, chalu ghadamodi,Dmart)