आंतरराष्ट्रीय पर्यावरण बदल समिट 2028 (COP28 ) भारतात होणार; PM मोदींची दुबईत घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 डिसेंबर रोजी दुबईत सुरु असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या जागतीक जलवायू कारवाई शिखर संमेलनाला (COP28) हजेरी लावली. या ठिकाणी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केलं.
यावेळी मोदी म्हणाले, पर्यावरण आणि अर्थव्यवस्था यांच्यामध्ये संतुलन राखल्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणून भारत जगासमोर उभा आहे. तसेच यावेळी त्यांनी पुढची COP33 ही आंतरराष्ट्रीय पर्यावरण बदल समिट भारतात घेण्याचा प्रस्ताव ठेवला.
मोदी काय म्हणाले?
या शिखर संमेलनात मोदी म्हणाले, "भारतात जगातील १७ टक्के लोक राहतात. याशिवाय वैश्विक कार्बन उत्सर्जनात भारताचं योगदान ४ टक्क्यांहून कमी आहे. तसेच भारत जगातील त्या काही अर्थव्यवस्थांपैकी एक आहे जो एनडीसीचं लक्ष्य पूर्ण करण्याच्या वाटेवर आहे. भारतानं पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेदरम्यान खूपच चांगला समन्वय राखत जगासमोर विकासाचं एक मॉडेल सादर केलं आहे" पंतप्रधान मोदींनी २०२८ मध्ये भारतात सीओपी ३३ संमेलनाचं आयोजन करण्यााच प्रस्ताव ठेवला. त्यांनी म्हटलं की, भारत जलवायू परिवर्तन प्रक्रियेसाठी संयुक्त राष्ट्र फ्रेमवर्कसाठी प्रतिबद्ध आहेत.
(MPSC Study, MPSC Notes, MPSC Syllabus, Current Affairs, UPSC, chalu ghadamodi, PM Modi)