९ वी पंचवार्षिक योजना

MPSC TECH
0





Image result for panchwarshik yojana





९ वी पंचवार्षिक योजना


कालावधी: इ.स. १-एप्रिल-१९९७ - इ.स. ३१-मार्च-२००२


प्राधान्य : उत्पादक रोजगार निर्मिती घोषवाक्य : सामाजिक न्याय आणि समनतेसह आर्थिक वाढ. खर्च : प्रस्तावित खर्च- ८,९५ ,२०० कोटी रु., वास्तविक खर्च- ९,४१,०४० कोटी रु.


प्रकल्प : १. कस्तुरबा गांधी शिक्षण योजना(१५ ऑगस्ट १९९७)- स्त्री साक्षरता कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये मुलींच्या शाळा काढणे. २. स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना(डिसेंबर १९९७)- शहरातील बेरोजगारांसाठी स्वयंरोजगार ३. भाग्यश्री बाल कल्याण योजना ४. राजराजेश्वरी महिला कल्याण योजना(१९ ऑक्टोबर १९९८)- स्त्रियांसाठी विमा संरक्षण ५. अन्नपूर्णा रोजाना(मार्च १९९९) - पेन्शन न मिळणाऱ्या जेष्ठ नागरिकांना १० किलो अन्नधान्य पुरवठा. ६. स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना(१ एप्रिल १९९९)- IRDP, TRYSEM, DWCRA, SITRA, गंगा कल्याण योजना, दशलक्ष विहिरींची योजना या सहा योजनांचे एकत्रीकरण करून तयार करण्यात आली. ७. जवाहर ग्राम समृद्धी योजना(१ एप्रिल १९९९)- सामुदायिक ग्रामीण पायाभूत सुविधांची निर्मिती. ८. अंत्योदय योजना(२५ डिसेम्बर २०००)- स्वस्त भावाने अन्नधान्य. ९. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना(२५ डिसेम्बर २०००) १०. प्रधानमंत्री ग्रामोदय योजना(२०००-०१)- प्राथमिक आरोग्य, प्राथमिक शिक्षण, ग्रामीण गृहनिर्माण, ग्रामीण पेयजल, पोषण, ग्रामीण विद्युतीकरण. ११. सर्व शिक्षा अभियान(२००१)- शिक्षण न घेणाऱ्या मुलांची संख्या कमी करणे.


महत्वपूर्ण घटना : National Highways Development Programme हाती घेण्यात आला. सार्वजनिक शेत्रातील उद्योगांना स्वायत्तता देण्यासाठी नवरत्न व मिनिरत्न शृंखला सुरु करण्यात आली. कृषी विमा महामंडळाची स्थापना करण्यात आली.





मूल्यमापन : कृषी क्षेत्रात वाढीचा दर कमी झाला. कृषी क्षेत्रात वार्षिक सरासरी वाढीचा दर २.४४% उद्योग क्षेत्रात वार्षिक सरासरी वाढीचा दर ४.२९% सेवा क्षेत्रात वार्षिक सरासरी वाढीचा दर ७.८७ %





टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)