दुसरे अफगाण युद्ध : (१८७५–१८७९).

MPSC TECH
0


style="display:block"
data-ad-client="ca-pub-2641908921743196"
data-ad-slot="4356803321"
data-ad-format="auto"
data-full-width-responsive="true">



Image result for british afghan war





दुसरे अफगाण युद्ध : (१८७५१८७९).


इंग्लंड व रशिया यांत अफगाणिस्तानात आपापले वर्चस्व स्थापन करण्याची
स्पर्धा होती. यातूनच दुसरे अफगाण युद्ध उद्भवले.


वारसाहक्काच्या भांडणाचा निकाल लागून १८६८ मध्ये शेरअली हा अमीर झाला.


रशियाचे मध्य आशियात वर्चस्व वाढल्यामुळे शेरअलीने इंग्रजांकडे मदत
मागितली परंतु इंग्रजांच्या धरसोडीमुळे त्याने रशियाबरोबर मैत्रीची याचना केली.


रशियाचा वकील काबूलला जाताच
गव्हर्नर जनरल लॉर्ड लिटनने शेरअलीस आपलाही वकील काबूल येथे ठेवून घेण्याचा आग्रह
धरला.


शेरअलीने ही विनंती नाकारताच गव्हर्नर जनरल लॉर्ड लिटनने त्याविरुद्ध
युद्ध पुकारले.


जनरल रॉबर्टजनरल
स्ट्यूअर्ट व सॅम ब्राउन हे खैबर खिंडीतून अफगाणिस्तानात पोहोचले.


इंग्रजांनी कंदाहार घेताच शेरअली रशियाच्या हद्दीत पळाला. त्याचा
मुलगा याकूबखान याने इंग्रजांबरोबर १८७९ मध्ये गंदमक येथे तह केला.


या तहानुसार इंग्रज वकील काबूल येथे रहावयाचा होता. कुर्रमपिशी आणि तिवी ही ठिकाणे इंग्रजांच्या ताब्यात
आली.


अफगाणांना हा तह मान्य नसल्यामुळे त्यांनी काही इंग्रज अधिकाऱ्यांचे
खून केले व याकूबखानला कैद केले. त्याचा भाऊ अयूबखान याने बंड करुन इंग्रज फौजेचा
मैवंद येथे पराभव केला.


शेवटी गव्हर्नर जनरल रिपनने शेरअलीचा पुतण्या अब्दुर रहमान याच्याशी
तह करुन दुसरे अफगाण युद्ध थांबविले.


इंग्रजांनी अमीराकडून खंडणी घेऊन गंमडकच्या तहाने सोडलेला प्रदेश परत
मिळविला.


या युद्धामुळे इंग्रजांचे वर्चस्व अफगाणिस्तानात स्थापन होऊन
रशियाच्या आक्रमक धोरणाला पायबंद बसला.























































style="display:block"
data-ad-client="ca-pub-2641908921743196"
data-ad-slot="4356803321"
data-ad-format="auto"
data-full-width-responsive="true">

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)