
भारताच्या महिला हॉकी संघाने २०१८च्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये रौप्यपदक जिंकले होते. त्या संघात सुनीताचा समावेश होता. २८ वर्षीय सुनीताच्या गुडघ्यावर आणखी एक शस्त्रक्रिया आवश्यक आहे.भारताच्या महिला हॉकी संघाची बचावपटू सुनीता लाक्राने गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे अंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती पत्करली आहे.सुनीताने १३९ सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. विशेष म्हणजे या वर्षी होणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे सुनीताचे स्वप्न होते. ‘‘आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्त होत आहे. २०१६मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे त्या वेळेस तीन दशकांनंतर भारताच्या महिला हॉकी संघाला ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचा मान मिळाला होता. या आठवणी नेहमी आपल्यासोबत राहणार आहेत. ‘हॉकी इंडिया’चीही मी आभारी आहे. दुखापतींवर चांगले उपचार मिळण्यापासून प्रत्येक वेळी हॉकी इंडियाकडून चांगले सहकार्य लाभले,’’ असे सुनीताने म्हटले सुनीता लाक्राचा जन्म ओदिशामधील राजगंजपूर येथे शेतकरी कुटुंबात झाला. वडिलांनी सुनीताला सहाव्याच वर्षी रॉरकेला येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणात (साई) हॉकी प्रशिक्षणासाठी पाठवले. वास्तविक लाक्रा यांच्या घरात सर्व मुले व मुली फुटबॉल खेळायचे. मात्र तरीदेखील हा खेळ धोकादायक आहे असे मानणाऱ्या सुनीताच्या वडिलांनी आपल्या मुलीला हॉकीसाठी प्रोत्साहन दिले.
कामगिरी
* १३९ सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व
* २०१४मध्ये इन्चॉनमधील एशियाडमध्ये कांस्यपदक
* २०१८ आशिया चॅम्पियन्स चषक स्पर्धेत भारताचे नेतृत्व- स्पर्धेत भारताला दुसरे स्थान
* २०१८मध्ये जकार्तामधील एशियाडमध्ये रौप्यपदक
style="display:block"
data-ad-client="ca-pub-2641908921743196"
data-ad-slot="5725779219"
data-ad-format="auto"
data-full-width-responsive="true">