हंटर आयोग

MPSC TECH
0




हंटर आयोग







 हंटर
आयोगाची स्थापना ब्रिटिशांच्या काळात
1882 मध्ये लॉर्ड रिपन द्वारे करण्यात आली. चार्ल्स वूड च्या
अहवाला चे निरीक्षण करण्यासाठी या आयोगाची स्थापना करण्यात आली. या आयोगाचे
अध्यक्ष विल्यम हंटर हे होते. या आयोगात आठ भारतीय सदस्य देखील होते. या आयोगाचे
क्षेत्र केवळ प्राथमिक व माध्यमिक शिक्षणा पूरते मर्यादित होते. वुड चा अहवाल
19 जुलै 1854 ला सादर करण्यात आला. या अहवालाचा प्रभाव
पुढील
50 वर्षे होता. या अहवालाचे निरीक्षण करण्यासाठी हंटर
आयोग स्थापन करण्यात आला होता.


 या
आयोगाने प्राथमिक शिक्षण विषयक धोरण
, कायदे, व्यवस्थापन, प्राथमिक शाळांना प्रोत्साहन, शिक्षकाचे प्रशिक्षण
इत्यादी वर आपला अहवाल प्रसिद्ध केला.


हंटर आयोगाच्या शिफारशी


हंटर आयोगाने खलील काही महत्वपूर्ण शिफारशी
केल्या होत्या


प्राथमिक शिक्षण स्थानिक भाषेत द्यावे


प्राथमिक शिक्षणाला अधिक वित्त पुरवठा मिळावा


कोणत्याही व्यक्तीला नोकरी देतांना त्या
व्यक्तीस लिहिता वाचता येते की नाही हे पाहावे


इंग्लंड मध्ये 1870 ते 1876 प्रमाणे
केलेल्या कायद्यासारखे शिक्षण विषयक कायदे भारतात देखील करावे


प्राथमिक शिक्षणाची जिम्मेदारी जिल्हा किंवा
नगरपरिषदा कडे सोपवावी


स्थानिक शाळांना प्रोत्साहन द्यावे.


प्राथमिक शाळांतील शिक्षका साठी प्रशिक्षणाची
सोय करावी.





style="display:block"
data-ad-client="ca-pub-2641908921743196"
data-ad-slot="5919196816"
data-ad-format="auto"
data-full-width-responsive="true">

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)