पचनक्रिया (With Animated Video )

MPSC TECH
0

style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-2641908921743196"
data-ad-slot="4793160860">


                                           पचनक्रिया


पचन
तंत्राच्या मुख
, जठर, लघ्वांत्र आणि बृहदांत्र या चार मार्गांत प्रामुख्याने पचनक्रिया होते.



मुख : पचन तंत्राचे मुख हे सुरुवातीचे द्वार असून
त्यात अन्नाचे चर्वण प्रामुख्याने होते. त्याशिवाय लाला ग्रंथींचा स्राव (लाल)
येथेच मिसळत असल्यामुळे अन्नाचा गिळण्यास सुलभ असा घास बनतो. लाळेत जी एंझाइमे
असतात ती अन्नातील कार्बोहायड्रेट घटकांच्या विघटनास सुरुवात करतात. अन्नातील पॉलिसॅकॅराइडांपासून
डेक्स्ट्रीन व माल्टोज ही मोनोसॅकॅराइडे या एंझाइमांच्या क्रियेमुळे तयार होतात .
सेवन केलेल्या मिश्र अन्नातील एकूण कार्बोहायड्रेटांपैकी ४०% भाग जेवणानंतर एका
तासात अपघटित होतो. लाळमिश्रित गिळलेला घास जठरात उतरल्यानंतर घासात तेथील अम्ल
पूर्णपणे भिनेपर्यंत लाळेचे कार्य तेथेही चालूच असते.



जठर : हा पचन तंत्राचा सर्वांत अधिक फुगीर भाग असून
त्याची धारणक्षमता सु. ९५० घ. सेंमी. असते. त्याचा सर्वसाधारण आकार इंग्रजी
J
अक्षरासारखा असून तो व्यक्तिशः निरनिराळा व त्यामधील साठ्याप्रमाणे
बदलतो. जठरभित्ती अरेखित
(ज्यावर उभ्या रेषा नाहीत अशा
अनैच्छिक) स्नायूंच्या उभ्या गोलाकार आणि तिरप्या रचलेल्या स्नायुकोशिकांच्या
बनलेल्या असल्यामुळे त्यांची हालचाल अन्न घुसळून घुसळून जठररसात मिसळविते.
जठराच्या आतील भागाचे अस्तर जाडसर श्लेष्मकरेचे बनलेले असते. जठर जेव्हा रिकामे
असते तेव्हा या श्लेष्मकलास्तरावर अनेक छोट्या छोट्या वळ्या पडलेल्या असतात.
वळ्यांच्या उंच भागावर लहान लहान खड्डे असतात व त्यांना जठर खळगे म्हणतात. या
प्रत्येक खळग्यात एक जठर ग्रंथीचे तोंड असते. जठराच्या निरनिराळ्या भागांत जठर ग्रंथी
निरनिराळ्या प्रकारच्या असतात :



1.      
अम्लस्रावी



2.      
एंझाइमजनक
आणि



श्लेष्मास्रावी हायड्रोक्लोरिक अम्ल, पेप्सीन आणि श्लेष्मा
या त्यांच्या स्राव मिश्रणापासून जठररस तयार होतो. यांशिवाय जठररसात इतरही काही
पदार्थ असतात. हायड्रोक्लेरिक अम्ल पेप्सिनाच्या प्रथिनावरील योग्य क्रियेस मदत
करते. जठर-लायपेज नावाचे आणखी एक एंझाइम लोणी व अंड्याच्या पीतकातिल वसा भागाच्या
पचनास मदत करते. जठररसाचे उत्पादन अहोरात्र चालूच असते व चोवीस तासांत २ ते ३ लि.
जठररस तयार होतो. या उत्पादनावर तंत्रिकांचे (मज्जांचे) व



style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-2641908921743196"
data-ad-slot="4793160860">


3.      
अन्नसेवन
करावयास लागताच जठररसाचे उत्पादन वाढते. उत्पादनाचे तीन टप्पे असून त्यांना
अनुक्रमे मस्तिष्क टप्पा
, जठर टप्पा आणि आंत्र
टप्पा अशी नावे आहेत. अन्नाचे दर्शन
, अन्नाचा सुवास आणि
आवडत्या अन्नपदार्थांचा विचार या गोष्टी मेंदूवरील प्रतिक्षेपी क्रियांपासून जठररस
उत्पादन वाढवतात व म्हणून या टप्प्याला मस्तिष्क टप्पा म्हणतात. या उत्पादनावर रा
, भीती, काळजी आदी भावना परिणाम
करतात. अन्नातील काही प्रकार जठरनिर्गमकोटर भागातील जठर ग्रंथींना चेतावणी देऊन
गॅस्ट्रिन नावाचे हॉर्मोन उत्पन्न करतात. हे हॉर्मोन रक्तातून जठराच्या इतर
भागातील जठर ग्रंथींना पोहोचताच त्यांचा स्राव वाढतो. या दुसऱ्या टप्प्याला जठर
टप्पा म्हणतात. जठरातील अ र्ध व ट प च ले ली प्रथिने ते थी ल श्लेष्मकलास्तरातील
ग्रंथीपासून आंत्रगॅस्ट्रिन नावाचे हॉर्मोन तयार करतात. हे हॉर्मोन रक्तप्रवाहातून
जठर ग्रंथींपर्यंत पोहोचून त्यांचे उत्पादन वाढविते. या ति स ऱ्या टप्प्याला आंत्र
टप्पा म्हणतात.



4.      
जठरातील
पचनक्रिया चालू असताना अन्नापासून जो सारखी दृढता असलेला अर्धद्रव पदार्थ तयार
होतो
, त्यालाआमरस’ (काइम) म्हणतात. हा आमरस ग्रहणीत जठरद्वारा क
पा टा तू न (झडपेतून) थोड्या थोड्या प्रमाणात सोडला जातो. एका वेळी सेवन केलेल्या
अन्नाचे पचन करून पुन्हा पूर्ण रिकामे होण्यास जठरास सर्वसाधारणपणे सहा तास
लागतात. अन्नप्रकार व भावनिक परिस्थिती यांचा या कालावर परिणाम होतो.
कार्बोहायड्रेटे प्रथिनांपेक्षा अधिक लवकर ग्रहणीत उतरतात
, तर
वसायुक्त पदार्थांना सर्वांत जास्त वेळ लागतो. भीती
, राग यांसारख्या
भावना कधीकधी हा काल चोवीस तासांपर्यंत वाढवितात

                                                       For Video learning Please click below link


.







style="display:block"
data-ad-client="ca-pub-2641908921743196"
data-ad-slot="5919196816"
data-ad-format="auto"
data-full-width-responsive="true">

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)