प्रार्थना समाज : Part 1

MPSC TECH
0

 

प्रार्थना समाज :

राजा राम मोहन रॉय यांनी काढलेल्या ब्राम्हो समाजाच्या विचारांचा महाराष्ट्र्रावरही प्रभाव पडला होता व त्या दृष्टीने 1949 मध्ये परमहंस सभा स्थापन करण्यात आली.तर 1867 मध्ये केशवचंद्र सेनच्या प्रेरणेने मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना झाली. आत्माराम पांडुरंग नावाच्या सुधारक वृत्तीवरच्या व्यक्तीने हा समाज स्थापन करण्याच्या कामी पुढाकार घेतला प्रार्थना समाजपचे स्वरुप ब्राहो समाजापेक्षा वेगळे होते. प्रार्थना समाजातील सभासद स्वत:ला प्रार्थना समाजाचे स्वरुप ब्राहो समाजापेक्षा वेगळे असे मानीत नव्हते, तर हिंदू धर्मातील एक चळवळ मानीत.प्रार्थना समाजाची श्रध्दा पूर्णपणे हिंदू धर्मावर होती. समाज सुधारण हे उद्दिष्ट मानून प्रार्थना समाजाने विश्र्वासापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर अधिक भर दिला. मानव सेवा हीच खरी ईश्र्वराची भक्ती असे प्रार्थना समाजाचे मत होते.

स्थापना : ३१ मार्च १८६७, मुंबई

संस्थापक : दादोबा पांडूरंग व डॉ. आत्माराम पांडूरंग

मुख्य आधारस्तंभ : श्री. आर. जी. भांडारकर व न्यायमूर्ति महादेव गोविंद रानडे

इतर महत्त्वाचे सभासद : जस्टिम चंदावरकर व वामन आबाजी मोडक

प्रार्थना समाजाचे महत्वाचे उद्देश

1) जातिभेद निर्मूलन

2) बालविवाह प्रतिबंध,

3) विधवा विवाह

4) स्त्री शिक्षण

तत्त्वज्ञान

परमेश्वर एक असून तो विश्वाचा निर्माता आहे. तो निराकार आहे. तो दयाळू आहे. तो सर्वांवर प्रेम करतो.

सत्य, सदाचार व भक्ती हे परमेश्वराच्या उपासनेचे खरे मार्ग आहेत. या मार्गानेच गेल्यानंतर तो प्रसन्न होतो.

प्रार्थनेमुळे भौतिक फलप्राप्ती होत नाही, मात्र प्रार्थनेमुळे आध्यात्मिक उन्नती होते.

परमेश्वर अवतार घेत नाही. त्याने कोणताही धर्मग्रंथ लिहिला नाही.

मूर्तिपूजा परमेश्वरास मान्य नाही.

सर्व मानव एकाच परमेश्वराची लेकरे आहेत. म्हणूनच सर्वांनी बंधुत्त्वाच्या भावनेने एकमेकांशी व्यवहार करावा.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)