लेखन :
प्रबंध :
एन्शंट इंडियन कॉमर्स (प्राचीन भारतीय व्यापार) 15 मे, 1915 : एम.ए. च्या पदवीसाठी भीमरावांनी या विषयावर प्रबंध लिहून तो कोलंबिया विद्यापीठाला सादर केला. 2 जून, 1915 रोजी या प्रबंधाच्या आधारावर त्यांना विद्यापीठाने एम.ए.ची पदवी प्रदान केली. हा प्रबंध नंतर अॅडमिशन अँड फायनान्स ऑफ इस्ट इंडिया कंपनी नावाचे प्रकाशित करण्यात आला.
भारतातील प्रांतीय अर्थव्यवस्थेची उत्क्रांती (1925) : आंबेडकरांचा पीएच.डी. चा हा प्रबंध ब्रिटिश लंडनच्या पी.एस. किंग अँड कंपनीने ग्रंथरूपात प्रकाशित केला. प्रा. सेलिग्मन यांनी ग्रंथाची प्रस्तावना लिहिली होती.
प्रॉव्हिन्शियल डीसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया (ब्रिटिश भारतातील साम्राज्यीय अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण) : जून 1921 मध्ये एम.एस्सी. च्या पदवीसाठी लंडन विद्यापीठात सादर केला. विद्यापीठाने प्रंबंध स्वीकारून 20 जून 1921 रोजी त्यांना अर्थशास्त्रातील एम.एस्सी. ही पदवी प्रदान केली.
द प्रोब्लम ऑफ रुपी' (रुपयाचा प्रश्न) : 'डॉक्टर ऑफ सायन्स' (डी.एस्सी.) च्या पदवीसाठी ऑक्टोबर 1922 मध्ये अर्थशास्त्रीय प्रबंध लंडन विद्यापीठात सादर केला. डिसेंबर 1923 मध्ये लंडनच्या पी.एस. किंग अँड कंपनी प्रकाशन संस्थेने ग्रंथरुपाने प्रसिद्ध केला. या ग्रंथाला त्यांचे मार्गदर्शक अर्थशास्त्रज्ञ डॉ. कॅनन यांनी प्रस्तावना लिहिली होती.
पुस्तक :
कास्ट्स इन इंडिया : देअर मेकनिझम, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट (भारतातील जाती : त्यांची रचना, उत्पत्ती आणि वृद्धी) :
कास्ट्स इन इंडिया व स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमिडीज
वेटिंग फॉर अ व्हिझा : 1935-36 या कालावधी दरम्यान लिहिलेल्या या आपल्या आत्मकथेत आंबेडकरांनी अस्पृश्यतेसंबंधी त्यांना आलेल्या कटु अनुभवांच्या आठवणींच्या नोंदी केलेल्या आहेत. हे आत्मचरित्रपर पुस्तक कोलंबिया विद्यापीठात 'पाठ्यपुस्तक' म्हणून वापरले जाते.
इतर पुस्तक :
'ईस्ट इंडिया कंपनीचे भारतातील प्रशासन आणि अर्थकारण'
'ब्रिटिश भारतातील प्रांतीय आर्थिक उत्क्रांती'
वृत्तपत्र :
'बहिष्कृत भारत' : बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून अस्पृश्योद्धाराचे कार्य व इतर समाजकार्य करण्यासाठी हे वृत्तपत्र सुरु केले.
'मूकनायक' पाक्षिक : 1920 मध्ये समाजप्रबोधनाची ही चळवळ नेटाने सुरु ठेवण्यासाठी चळवळीला मदत करणारे एखादे वृत्तपत्र सुरू करावे असे आंबेडकरांना वाटू लागले. या साठी कोल्हापूरचे राजे शाहू महाराज यांनी आंबेडकरांना वृत्तपत्र काढण्यासाठी अडीच हजार रुपयांची मदत केली. या मदतीमुळे आंबेडकरांनी इ.स. 1920 साली मुंबईत मूकनायक नावाचे पाक्षिक सुरू केले व पांडुरंग नंदराम भटकर यांना पाक्षिकाचे संपादक नेमले. मूकनायक पाक्षिकाचा पहिला अंक 31 जानेवारी, 1920 रोजी प्रकाशित करण्यात आला.