जगन्नाथ शंकरशेठ यांनी भूषविलेली महत्वाची पद
मॅजिस्ट्रेट : पहिले देशी मॅजिस्ट्रेट
फेलो : मुंबई विद्यापीठ
ट्रस्टी : बॉंम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी
विश्वस्त : एल्फिन्स्टन फंड.
संस्थापक अध्यक्ष : बॉंम्बे असोसिएशन
संस्थापक : जगन्नाथ शंकरशेठ स्कुल, द मर्कंटाईल बॅंक ऑफ इंडिया
संचालक/अध्यक्ष : बॉम्बे नेटिव्ह डिस्पेन्सरी (पहिला धर्मार्थ दवाखाना )
अध्यक्ष : पोटसमिती (शिक्षण प्रसार समिती), डेव्हिड ससून रिफॉर्मेटरी इन्स्टिटयूट, हॉर्टिकल्चर सोसायटी, जिओग्राफिकल सोसायटी, बॉंम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी, बादशाही नाट्यगृह,
उपाध्यक्ष : स्कुल ऑफ इंडस्ट्रीज,
आद्य संचालक : रेल्वे (मुंबई ते ठाणे पहिला रेल्वे प्रवास गोल्डन पासने)
संचालक : बॅंक ऑफ वेस्टर्न इंडिया, कमर्शिअयल बॅंक ऑफ इंडिया
संस्थापक सदस्य : जे. जे. आर्टस् कॉलेज
सदस्य : बोर्ड ऑफ कॉन्झरवंसी, मुंबई विद्यापीठ व्यवस्थापक मंडळ, सिलेक्ट समिती (म्युनसिपल कायदा व बिल), बोर्ड ऑफ एज्युकेशन, नेटिव्ह स्कुल बुक सोसायटी, द इनलॅंड रेल्वे असोसिएशन
सन्मान :
देशाच्या सर्वांगीण सुधारणेच्या साऱ्या चळवळींत पुढाकार घेणाऱ्या या थोर पुरुषाचा पुतळा जिजामाता बागेत उभारण्यासाठी लोकांनी स्वेच्छेने 25,000 रु जमविले होते.
नानांच्या स्मरणार्थ मॅट्रिकला संस्कृत विषयात पहिला येणाऱ्या विद्यार्थास शंकरशेट शिष्यवृती देण्यात येऊ लागली.
मुंबईतील सेंट्रल रेल्वे स्टेशन ला नाना शंकरशेठ यांचे नाव देण्यात आले आहे
इतर महत्वाची माहिती :
महानगरपालिकेत आयुक्त असताना त्यांनी आरोग्यव्यवस्था, विहिरी, तलाव वगैरे योजना अंमलात आणल्या. गॅंस कंपनी सुरू केली;
धर्मार्थ दवाखाना काढून तसेच पुढे मुंबई-ठाणे रेल्वेचा प्रारंभ, नाटकांचे प्रेक्षागृह, सोनापूरच्या स्मशानभूमीचे रक्षण यासाठी तरतुदी केल्या
नानांनी आईच्या स्मरणार्थ गोवालिया तलावाजवळ भवानी शंकर मंदिर व एक धर्मशाळा बांधली.
मुंबई कायदे मंडळाच्या आरंभीच्या सभासदांत ते प्रमुख होते.
1861 साली तत्कालीन मुंबई प्रांताच्या विधिमंडळात नानांना स्थान मिळालं.
1962 साली ते तत्कालीन मुंबई प्रांताच्या गव्हर्नरचे सल्लागर म्हणूनही नियुक्त झाले.
बॉम्बे म्युनिसिपल अॅक्ट तयार करण्यात नाना शंकरशेट यांनी योगदान दिलंय. याच कायद्यान्वये मुंबई महापालिकेची स्थापना झाली होती.
31 जुलै 1865 रोजी नाना शंकरशेट यांचं निधन झालं.