गोपाल कृष्ण गोखले यांचा जीवनप्रवास
जन्म : 9 मे 1866
1884 : मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजातून बी.ए. (गणित) ची परीक्षा उत्तीर्ण
1885 : पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 35 रुपये पगारावर त्यानी शिक्षकाची नोकरी पत्करली.
1886 : कायद्याची पदवी मिळवली
1886 : मध्ये पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीयसदस्य बनले.
1887 : फर्ग्युसन कॉलेजात इंग्रजी आणि इतिहास विषयाचे प्राध्यापक म्हणून ते काम करू लागले.
1888 : ‘सुधारक’ या वृत्तपत्राच्या इंग्रजी विभागाच्या संपादकाची जबाबदारी गोपाळ कृष्ण गोखले यांनी सांभाळली.
1889 : राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश.
1890 : सार्वजनिक सभेचे सचिव म्हणून त्यांची निवड झाली.
1895 : मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर ‘फेलो’ म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
1897 : गोखले यांनी वेल्बी कमिशनपुढे साक्ष देण्यासाठी इंग्लंडला भेट दिली.
1899 : मुंबई प्रांतिक कायदे मंडळाचे सभासद म्हणून ते निवडून आले.
1902 : केंद्रीय कायदेमंडळाचे सभासद म्हणून त्यांची निवड झाली.
1905 : ‘भारत सेवक समाज’ (सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटी) ही संस्था स्थापन केली.
1905 : बनारस येथे भरलेल्या राष्ट्रीय कांग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली.
1909 : त्यांच्यातील क्षमतेची दखल घेऊन तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड मिंटो यांनी नामदारांना 1909 सालच्या मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्याचा मसुदा तयार करण्यास सांगितले.
1912 : भारतातील सनदी नोक-यांशी संबंधित रॉयल कमिशनचे सदस्य म्हणून नियुक्ती झाली.
1912 : महात्मा गांधींच्या निमंत्रणावरून ते दक्षिण आफ्रिकेला गेले. दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रही चळवळीला साहाय्य करण्यासाठी निधी उभारण्याच्या कामीही त्यांनी पुढाकार घेतला होता.
मृत्यू : 19 फेब्रुवारी 1915
इतर महत्वाची माहिती :
सभागृहात अर्थसंकल्पावरील भाषणे गाजविणे हा तर त्यांचा हातखंडा होता. ते भारतातील पहिल्या श्रेणीचे अर्थतज्ज्ञ होते.
भारतातील ब्रिटिश राज्याच्या वाढत्या खर्चाची चौकशी करण्यासाठी लॉर्ड वेल्बी यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या आयोगासमोर गोखले यांची साक्ष अतिशय महत्त्वाची ठरली होती. बुद्धिमत्तेच्या व गाढ व्यासंगाच्या आधारे दिलेल्या साक्षीमुळे त्यांचे नाव महाराष्ट्रात किंवा भारतातच नव्हे, तर परदेशातही प्रसिद्ध झाले.
महात्मा गांधींनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करताना गोपाळकृष्ण गोखले यांना आपले गुरु मानले.
गोपाळ कृष्ण गोखले हे कुशल राजनीतिज्ञ होते. राजकारणाच्या प्रति त्यांचा दृष्टिकोण उदारमतवादी होता.
‘राजकारणाचे अध्यात्मीकरण’ ही अतिशय वेगळी (परंतु कोणत्याही स्तरावरील, क्षेत्रातील राजकारणात सर्वकाळ अत्यावश्यक असणारी) संकल्पना त्यांनी भारतात मांडली.
गोखले यांच्या सांगण्यावरूनच महात्मा गांधींनी संपूर्ण देशाचा दौरा केला आणि अहिंसात्मक सत्याग्रहाची चळवळ देशामध्ये उभी करण्यात ते यशस्वी ठरले.
संपूर्ण आयुष्य राजकारणात राहूनही ’राजकारण’ न करता विशुद्ध सार्वजनिक जीवन जगणाऱ्या या महाराष्ट्राच्या सुपुत्राचे वयाच्या अवघ्या 49 व्या वर्षी निधन झाले.