मोदी यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम किसान योजना सुरू केली होती. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षातून तीन वेळा दोन हजार रुपये, असे वर्षातून सहा हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत दोन हजार रुपयांचे 13 हप्ते पूर्ण झाले आहेत. 13 वा हप्ता 27 फेब्रुवारीला देण्यात आला होता. सरकारने केलेल्या घोषणेनुसार येत्या 28 जुलैला शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता मिळाला. या दिवशी देशातील जवळपास नऊ कोटी शेतकऱ्यांना 14 वा हप्ता दिला जाणार आहे.
पीएम किसान योजनेचे फायदे
या योजनेद्वारे देशातील शेतकऱ्यांना वर्षाचे सहा हजार मिळतात. वर्षातील तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये मिळतात. शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा म्हणून ही योजना राबवण्यात आली आहे.
शेतकरी या योजनेचे लाभार्भी आहे की नाही, हे कसे जाणून घ्यावे?
- पीएम किसानच्या वेबसाइटवर जा.
- फॉर्मस कॉर्नरमध्ये बेनिफिशरी स्टेटस दिसेल, त्यावर क्लिक करा.
- त्यात आधार कार्ड नंबर आणि बँकेशी संबंधित मोबाईल नंबर भरा.
- काही क्षणातच पीएम किसान योजनेचे तुम्ही लाभार्थी आहे की नाही कळेल.