इस्लामनुसार जीवन जगण्यासाठी पाकिस्तानी संघाची खेळाडू आयशाने वयाच्या 18व्या वर्षी सोडले क्रिकेट.

MPSC TECH
0

 

aayesha naseem


स्लामनुसार जीवन जगण्यासाठी पाकिस्तानी संघाची खेळाडू आयशाने वयाच्या 18व्या वर्षी सोडले क्रिकेट.

पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची आशादायी युवा खेळाडू आयशा नसीम हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आयशा फक्त 18 वर्षांची आहे. इस्लामनुसार जीवन जगण्यासाठी तिने हा निर्णय घेतला आहे. नुकताच तिने  पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आपल्या निर्णयाची माहिती दिली. आयशाने 2020 मध्ये पाकिस्तानसाठी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तिने पीसीबीला सांगितले की, “मी क्रिकेट सोडत आहे आणि मला माझे जीवन इस्लामनुसार जगायचे आहे.”

आयशा नसीमची क्रिकेट कारकीर्द

आयशा नसीमने पाकिस्तानसाठी 4 वन डे आणि 30 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने 30 सामन्यांच्या टी20 कारकिर्दीत 128च्या स्ट्राइक रेटने 369 धावा केल्या आहेत. वन डेमध्ये तिच्या फक्त 33 धावा आहेत. तिने तिच्या टी20 कारकिर्दीत 18 षटकारही मारले आहेत. पाकिस्तान महिला संघासाठी टी20 इतिहासात आयशापेक्षा फक्त निदा दारने सर्वाधिक 27 षटकार मारले आहेत. मात्र तिने 130 सामने खेळले आहेत. पाकिस्तान महिला क्रिकेट संघाकडून खेळणाऱ्या आयशा नसीमचा जन्म 7 ऑगस्ट 2004 रोजी अबोटाबाद येथे झाला. फलंदाजी व्यतिरिक्त ही खेळाडू पाकिस्तानसाठी उजव्या हाताने मध्यम वेगवान गोलंदाजी करते.

मोठे षटकार ही आयशाची ओळख होती

आयशा नसीम तिच्या मोठ्या षटकारांसाठी प्रसिद्ध होती. 2023च्या महिला टी20 विश्वचषकातील दोन सर्वात मोठे षटकार आयशाने मारले होते. भारताविरुद्धच्या सामन्यात त्याने 81 मीटर लांब षटकार ठोकला. या स्पर्धेतील सर्वात मोठा षटकाराची नोंद तिच्या नावावर होती. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात तिने 79 मीटर लांब षटकार मारला होता. 2023च्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही तिच्या बॅटमधून मोठमोठे षटकार निघाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)