सभासदां साठी नियम :
१) ईश्वर (निर्मिक) एक असून तो सर्वव्यापी, निर्गुण, निर्विकार व सत्यरूप आहे आणि सर्व माणसे त्याची लेकरे आहेत. या निर्मिकाशिवाय (निर्मात्याशिवाय) मी इतर कशाचीही पूजा करणार नाही.
२) निर्मिकाची भक्ती करण्याचा पूर्ण अधिकार प्रत्येकाला आहे. त्यासाठी पुरोहित किंवा मध्यस्थाची आवश्यकता नाही.
३) माणूस जातीने श्रेष्ठ ठरत नसून गुणांनी श्रेष्ठ ठरतो.
४) निर्मिक सावयव रूपाने अवतरत नाही.
५) पुनर्जन्म, परलोक, मोक्ष, कर्मकांड, जपतप या गोष्टी अज्ञानमूलक आहेत; त्यांचा अवलंब माझ्याकडून होणार नाही.
६) जनावरांना मारण्यात मी सहभागी होणार नाही.
७) दारूच्या व्यसनापासून अलिप्त राहण्याचा मी प्रयत्न करीन
८) तसेच समाजाचा खर्च चालावा म्हणून मी माझ्या उत्पन्नातून काही वर्गणी देईन.
सत्यशोधक समाजाची नियतकालिके / प्रकाशने : सत्यशोधक चळवळीच्या ऐन बहराच्या काळात - १८७३ ते १९४० - अशी जवळपास ६०/६५ नियतकालिके निघाली.
दीनबंधु (१८७७- कृष्णराव भालेकर, नारायण मेघाजी लोखंडे, वासुदेवराव बिर्जे, श्रीमती तानुबाई बिर्जे)
संत्सार (१८८५- म. फुले)
दीनमित्र (१८८८- गणपतराव पाटील),
राघवभूषण (१८८८- गुलाबसिंह कौशल्य),
अंबालहरी (१८८९- कृष्णराव भालेकर),
शेतकऱ्यांचा कैवारी (१८९२- कृष्णराव भालेकर),
मराठा दीनबंधू (१९०१- भास्करराव जाधव),
दीनमित्र (१९१०- मुकुंदराव पाटील),
विश्वबंधू (१९११- बळवंतराव पिसाळ),
जागृती (१९१७- भगवंतराव पाळेकर),
जागरूक (१९१७- वालचंद कोठारी),
डेक्कन रयत (१९१८- अण्णा-साहेब लठ्ठे),
विजयी मराठा (१९१९- श्रीपतराव शिंदे),
सत्यप्रकाश (१९१९- नारायण रामचंद्र विभुते),
गरिबांचा कैवारी (१९२०- बाबूराव यादव),
भगवा झेंडा (१९२०- दत्ताजीराव कुरणे),
तरूण मराठा (१९२०- सखाराम पांडुरंग सावंत),
राष्ट्रवीर (१९२१- शामराव देसाई),
प्रबोधन (१९२१- के. सी. ठाकरे),
संजीवन (१९२१- द. भि. रणदिवे),
सिंध मराठा (१९२४- दत्तात्रय वासुदेव अणावकर),
हंटर (१९२५- खंडेराव बागल), मजूर (१९२५- रामचंद्र लाड),
कर्मवीर (१९२५- शि. आ. भोसले),
नवयुग (१९२६- बाबासाहेब बोले),
सत्यवादी (१९२६- बाळासाहेब पाटील),
बाह्मणेतर (१९२६- व्यंकटराव गोडे),
कैवारी (१९२८- दिनकरराव जवळकर)