मोहम्मद सिराजने वेस्ट इंडीजमध्ये रचला इतिहास, 34 वर्षांनंतर वर्ल्डकप विजेत्या ‘या’ माजी खेळाडूची केली बरोबरी

MPSC TECH
0

 

मोहम्मद सिराज

मोहम्मद सिराजने वेस्ट इंडीजमध्ये रचला इतिहास, 34 वर्षांनंतर वर्ल्डकप विजेत्या ‘या’ माजी खेळाडूची केली बरोबरी

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वीन्स पार्क ओव्हलवर खेळला गेला  सामन्यात तिसऱ्या दिवशी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने जबरदस्त गोलंदाजी करत वेस्ट इंडीजच्या फलंदाजांची चांगलीच पळताभुई केली. त्याने दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजच्या 5 फलंदाजांना बाद करून कसोटी क्रिकेटमधील आपला दुसरा 5 विकेट्स घेण्याचा टप्पा पूर्ण केला. यासह त्याने 34 वर्षे जुन्या कपिल देव यांच्या विक्रमाची बरोबरी केली.

सिराजने दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजच्या जोशुआ दा सिल्वा, जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, केमार रोच आणि शॅनन गॅब्रिएल यांना बाद करत फाईव्ह विकेट हॉल म्हणजेच दुसऱ्यांदा पाच विकेट्स घेतल्या. पोर्ट ऑफ स्पेन येथे कसोटीच्या एका डावात 5 विकेट्स घेणारा सिराज भारताकडून सातवा गोलंदाज ठरला. सिराजच्या आधी 1989 मध्ये भारताचा माजी कर्णधार कपिल देव पोर्ट ऑफ स्पेनमध्ये 5 विकेट्स घेणारा अव्वल गोलंदाज ठरला होता. आता मोहम्मद सिराजने 34 वर्षे जुन्या विक्रमाची पुनरावृत्ती केली आहे. सिराजचा हा पहिला वेस्ट इंडिज दौरा आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत वेस्ट इंडिजच्या भूमीवर एका डावात 5 विकेट्स घेणारा सिराज सातवा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी वेस्ट इंडिजमध्ये इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, कपिल देव, भुवनेश्वर कुमार, अभय कुरुविला आणि व्यंकटेश प्रसाद यांनी ही कामगिरी केली होती  

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)