प्लेस्टोअर अन् अॅपस्टोअरवर बदलला ट्विटरचा लोगो अन् नाव
इलॉन मस्कने विकत घेतल्यापासून ट्विटरमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. नुकताच ट्विटरमध्ये सगळ्यात मोठा बदल करण्यात आला. ट्विटरचं नाव आणि लोगो बदलून तो 'एक्स' करण्यात आलं होतं. आता गुगलच्या प्ले स्टोअर आणि अॅपलच्या अॅप स्टोअरवरही यात बदल करण्यात आले आहेत.
एका ट्विटच्या माध्यमातून इलॉन मस्कने या अॅपच्या नवीन लोगो आणि नावाचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे आता याठिकाणी twitter असं सर्च केल्यास नवीन लोगो आणि नाव असलेलं 'एक्स' अॅप दिसणार आहे. यासोबतच, ज्यांच्या फोनमध्ये आधीपासून ट्विटर इन्स्टॉल आहे, त्यांनी अॅप अपडेट केल्यानंतर त्यांना नवीन लोगो असलेला आयकॉन दिसणार आहे.