श्रीलंकेत भारतीय रुपया चालणार; मिळाला आंतरराष्ट्रीय चलनाचा दर्जा
श्रीलंकेने भारतीय रुपयाला आंतरराष्ट्रीय चलनाचा दर्जा दिला आहे. श्रीलंकेने त्यांच्या प्रणालीमध्ये भारतीय चलनाला नियुक्त चलन (विशेष परकीय चलन) म्हणून स्थान दिलं आहे, यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर रुपयाचं वजन वाढणार आहे. आपल्या चलनात व्यापार आणि व्यवहार करण्यासाठी श्रीलंकेने त्यांच्या प्रणालीमध्ये भारतीय रुपयाचा नियुक्त परकीय चलन म्हणून समावेश केला आहे.
श्रीलंका सरकारने भारतीय रुपयाला नियुक्त परकीय चलनाचा दर्जा दिल्यामुळे दोन देशांमधील व्यापार रुपयांमध्ये होऊ शकणार आहे. यासह श्रीलंकेत फिरायला जाणारे भारतीय पर्यटकही भारतीय रुपयांमध्ये व्यवहार करू शकतील.
भारतीय चलनाचा वापर भारताच्या खासगी क्षेत्रावर अवलंबून असेल, तसेच व्यापार क्षेत्रातील लोकांवर अवलंबून असेल.