स्वदेशी बनावटीची यंत्रणा सांगणार युद्ध विमानाचे नेमके स्थान; अंतिम चाचणीनंतर हवाई दलात होणार समावेश

MPSC TECH
0

 

Indian Air Force

 

 विमानावर क्षणागणिक लक्ष ठेवणारी स्वदेशी बनावटीची यंत्रणा (आरटीएटीएस) भारतीय हवाई दलाने पहिल्यांदाच विकसित केली असून अंतिम चाचणी घेतल्यानंतर ती यंत्रणा हवाई दलात समाविष्ट केली जाणार आहे,

ही यंत्रणा उपग्रहावर आधारित आहे. सध्या तिचे काम अंतिम टप्प्यात आहे. पूर्वेकडील क्षेत्रात (ईस्टर्न सेक्टर) शेवटची चाचणी व्हायची आहे. ती झाली की हवाई दलात यंत्रणा कार्यान्वित होईल. या यंत्रणेमुळे युद्ध विमान नेमके कुठे आहे याची क्षणाक्षणाला माहिती मिळणार आहे. एखाद्या विमानाचा अपघात झाल्यास काही वेळात ती जागा शोधणे शक्य होणार आहे.

या यंत्रणेच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या आहेत अंतिम चाचणी पूर्वेकडील  क्षेत्रात होणार आहे हवाई दल  आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यात आली आहेत. बऱ्याच वस्तू स्वदेशी बनावटी आहेत. या प्रकल्पाबाबत बोलायाचे झाल्यास ‘आरटीएटीएस’ याचा उल्लेख करावा लागेल. हा प्रकल्प  संपूर्णत असे स्वदेशी बनावटीचा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)