हंटर शिक्षण आयोग, १८८२

MPSC TECH
0

 


हंटर शिक्षण आयोग, १८८२

चार्ल्स वूड च्या शैक्षणिक योजने नुसार झालेल्या सुधारणांचा आढावा घेण्यासाठी त्या वेळेसचा भारताचा व्हाईसरॉय लॉर्ड रिपन यांनी एक समिती स्थापन केली या समितीचे अध्यक्ष म्हणून सर विल्यम हंटर यांची नेमणूक केली या समितीत एकूण २० सदस्य होते.  या समितीचा मूळ उद्देश सध्याच्या शिक्षण पद्धतीमधील दोष शोधणे त्या मध्ये सुधारणा सुचविणे हा होता. त्यामागील आणखी एक कारण असेही होते की, वूडच्या शिफारसींप्रमाणे भारतात शिक्षणकार्य चालत नाही अशी तक्रार इंग्लंडच्या धर्मप्रचारकांनी केली होती. हंटर आयोगाचे कार्यक्षेत्र प्राथमिक व माध्यमिक शिक्षण होते. त्यात विद्यापीठांच्या कार्यक्षेत्राचा समावेश नव्हता.या  आयोगाने सर्वच प्रांतात दौरे काढून जवळजवळ २०० ठराव संमत केले. या आयोगाला सुधारणा वेगवेगळ्या सुधारणा सुचविण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले आणि  पंडिता रमाबाई यांनी साक्ष दिली होती महात्मा फुले यांनी १९ ऑक्टोबर १८८२ रोजी हंटर आयोगाला सविस्तर निवेदन दिले होते. याला अनुसरूनच मग या आयोगाने पुढील सुधारणा सुचविल्या             हंटर आयोगाने सरकारला एकूण २३ शिफारशी केल्या.या शिफारशी नंतर लॉर्ड रिपन यांनी लगेच या आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी सुरू केली

या आयोगाने सुचावीलेल्या काही महत्वाच्या शिफारशी

·        खाजगी शिक्षण संस्थाना सरकारने उत्तेजन तसेच अनुदान द्यावे

·        महाविद्यालयांना आर्थिक मदत करावी

·        उच्च शिक्षणाची जबाबदारी सरकारने खाजगी संस्थाना द्यावी तर प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे द्यावी पण त्यावर सरकारचे नियंत्रण असावे

·        माध्यमिक शिक्षणाचे दोन प्रकार असावेत, एक विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थी तयार करण्याकरिता साहित्य शिक्षण आणि दुसरा प्रकार म्हणजे व्यापारासाठी किंवा व्यवसायासाठी विद्यार्थी तयार करण्याकरिता दिले जाणारे व्यावहारिक शिक्षण.

·        मुस्लीम समाजाच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यावे

·        स्थानिक सरकारने आपल्या उत्पनाचा काही भाग हा शिक्षणासाठी राखून ठेवावा.

·        प्राथमिक शिक्षणावर सरकारने अधिक लक्ष केंद्रित करून शाळांची तपासणी आणि देखरेख करण्यासाठीचे काम शिक्षण अधिकाऱ्यांना द्यावी.

·        शिष्यवृत्ती संदर्भात नवीन नियम तयार करून शैक्षणिक फी संदर्भात सर्वसाधारण सूत्र ठरविण्यात यावे.

·        विद्यार्थ्यांच्या शारीरिक , बौद्धिक आणि नैतिक शिक्षणाला महत्वाचे स्थान द्यावे

·        शहरातील प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी नगरपालिका व बोर्डावर सोपवावी

·        विद्यापीठाने पर्यायी व ऐछिक विषयाचे अभ्यासक्रम सुरु करावेत.

·        शाळा व महाविद्यालयाच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी सरकारी निरीक्षक नेमावेत

·        कलकत्ता, मुंबई व मद्रास या प्रेसिडेंसी नगरांव्यतिरिक्त स्त्रियांसाठी शिक्षणाची पुरेशी व्यवस्था नसल्याबद्दल आयोगाने खेद व्यक्त करून तशी व्यवस्था करण्याची व स्त्री शिक्षणाला चालना देण्याची शिफारस केली

हंटर आयोगाच्या शिफारशींचा   परीणाम

हंटर आयोगाच्या शिफारशींची व्हाईसरॉय यांनी त्वरीत अंमलबजावणी करून प्राथमिक शिक्षणाकडे लक्ष दिले तसेच खाजगी शिक्षण संस्थाना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली त्यामुळे भारताच्या शिक्षण व्यवस्थे मध्ये अमुलाग्र बदल घडून आला त्यामुळे हंटर आयोगाच्या शिफारशीना भारतीय शिक्षणाच्या इतिहासात क्रांतिकारक ठरतात.

१८८२ मधे पंजाब विद्यापीठाची आणि १८८७ मधे अलाहाबाद विद्यापीठाची स्थापना झाली

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)